Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

सतीश काळे यांच्‍या उमेदवारीने निवडणूकीत येणार रंगत

 


सांगावा न्युज, चिंचवड.दि. ५ : उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती. या दिवशी आपला अर्ज मागे न घेता स्‍वाभिमानाने लढा देण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी केला आहे. सध्या ते चिंचवडमधून निवडणुक रिंगणात उभे आहेत. त्‍यांच्‍या उमेदवारीने निवडणुकीत रंगत येणार आहे. तर विविध सामाजिक संघटनांचा त्‍यांना पाठिंबा पाहता भाजप उमेदवार शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांना काळे यांचे आव्‍हान उभे राहिले आहे. ते हे आव्‍हान पेलतात का,हे पहावे लागेल. 

शिवराय शाहु फुले आणि आंबेडकर यांचा स्‍वाभिमानी विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी निवडणुकीच्‍या मैदानात उभा राहण्याचा निर्धार सतीश काळे यांनी व्‍यक्‍त केला. चिंचवडमधून त्‍यांनी स्‍वराज्‍य राष्ट्र निर्माण सेनेचा उमेदवार म्‍हणून अर्ज देखील दाखल केला आहे. त्‍यांना पिंपरी-चिंचवड शहरासह चिंचवड विधानसभेतील पुरोगामी विचारवंत सामाजिक संघटना मराठा दलित मुस्‍लिम ओबीसी आदीसह सर्वच घटकांतील नागरिकांचा पाठिंबा आहे. काळे यांच्‍या प्रति सहानुभूती देखील व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे या मतदारसंघातून त्‍यांना ५० हजारांपेक्षा अधिक मते प्राप्‍त होतील,असा अंदाज राजकीय जाणकार बांधत आहेत. त्‍यांच्‍या या मतदानाने कोणाला फटका बसणार हे पहावे लागणार आहे. 

४ नोव्‍हेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. त्‍यांना अनेक प्रस्‍थापित पक्षाकडून माघारीसाठी विनवणी करण्यात आली. मात्र ज्‍या ठिकाणी सन्‍मानपुर्वक वागणूक नाही. तिथे कोणाचे न ऐकता जनतेच्‍या बाजूची भूमिका काळे यांनी घेतली. त्‍यामुळे त्‍यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता तो कायम ठेवत प्रस्‍थापितांना आव्‍हान दिले आहे. आगामी काळात जोमाने प्रचार करत नागरिकांचे मत मिळविण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

शिलाई यंत्र पोचणार घराघरात :

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून चिन्‍हाचे वाटप करण्यात आले.यामध्ये सतीश काळे यांना शिलाई यंत्र हे चिन्‍ह प्राप्‍त झाले आहे. शिलाई यंत्रांचा संबंध सर्वसामान्‍य महिला आणि पुरूषांशी येतो. प्रत्‍येक घराला या बाबत माहिती आहे. त्‍यामुळे प्रचार करताना चिन्‍ह पोचविताना अडचणी येणार नाहीत.शिलाई यंत्र घराघरात पोचेल,असा विश्‍वास काळे यांचे समर्थक व्‍यक्‍त करत आहेत. 

"लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि जनतेचा केवळ स्‍वतःच्‍या मतांसाठी वापर करण्याचे काम राजकीय लोकप्रतिनिधी करत आहेत.निवडणूका संपल्‍या नंतर यांना जनतेचे प्रश्‍न दिसत नाहीत. पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ गृहित धरण्याचे काम केले जाते. त्‍यामुळे उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत प्रस्‍थापित उमेदवारांना जनतेच्‍या ताकदीवर सळो की पळो करणार आहे"

______ सतीश काळे उमेदवार स्‍वराज्‍य राष्ट्र निर्माण सेना, चिंचवड विधानसभा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा