अशोका सोसायटी येथील सौ. रेखाताई माने यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सायं.५.३०. ला रॅली सभेच्या ठिकाणी मार्गस्थ होईल
सांगावा न्युज, थेरगाव. दि. ५ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री जगताप शंकर पांडुरंग यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भव्य जाहीर सभा बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ऎम्बियन्स हॉटेल शेजारी कस्पटे वस्ती काळेवाडी फाटा येथे संपन्न होणार आहे. या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन थेरगाव महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले आहे.
सभेसाठी ठीक सायंकाळी ५.३०. वाजता सौ. रेखाताई नरेंद्र माने यांचे जनसंपर्क कार्यालय लेन न. १०. अशोका सोसायटी येथून काळेवाडी फाटा सभेच्या ठिकाणी रॅली निघेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा