Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

फुटपाथ चोरांचा प्रताप - काळेवाडीतील जनता रस्त्यावर, प्रशासन गप्प का?


चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्तेवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच __ युवराज दाखले 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ : प्रभाग क्रमांक २७, तापकीर नगर, काळेवाडी येथे हॉटेल राजरत्न शेजारी बांधकाम व्यावसायिकाने मुजोरीचा कळस गाठला आहे. येथे 'लोटस् इन' नावाचे लॉजिंग बांधताना सर्वसामान्य जनतेसाठी असलेला सार्वजनिक फुटपाथच पूर्णपणे गायब केला आहे. ही फुटपाथ चोरी नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्तेवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच आहे असा आरोप करून युवराज दाखले यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

नेमकी समस्या काय आहे?
या मुख्य रस्त्यावर दररोज शेकडो शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार ये-जा करतात. फुटपाथ अस्तित्वात नसल्याने त्यांना भर रस्त्यातून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता असूनही ड प्रभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

नेमकी तक्रार काय आहे?
या गंभीर प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, संबंधित बांधकाम व्यावसायिकावर सार्वजनिक मालमत्तेची चोरी व अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून फुटपाथ तात्काळ मोकळा करावा, अशी लेखी तक्रार ड प्रभाग अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास इशारा!
जर प्रशासनाने ८ दिवसाच्या आत कारवाई केली नाही, तर शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या वतीने ड प्रभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा