Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे धरणे आंदोलन


पिंपरी चिंचवड शहरातील इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष तसेच विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने पिंपरी येथे केले धरणे आंदोलन 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ : निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाची संभ्रम निर्माण करणारी भूमिका, SIR प्रक्रियेतील साशंक कार्य पद्धती आणि अधिकारापासून वंचित होत असलेला मतदार याची जबाबदारी विद्यमानकेंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची असून ते लोकशाही मार्गाने निवडणूक पार पाडण्यास सक्षम नाहीत! त्यांचा कारकीर्दीत निवडणूक प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा आरोप करीत पिंपरी चिंचवड शहरातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आंदोलन केले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आज सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

देशातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट राहावी, निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात विश्वास कायम राहावा आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता व निष्पक्षता जपली जावी, या मुद्द्यांवर आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून,आयोगाच्या कामकाजाबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातील लोकशाही, समता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आवाज उठवणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

इंडिया आघाडी आणि पुरोगामी संघटनांच्या या धरणे आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन देशातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा