Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा


२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याच्या उ‌द्दिष्टावर होणार विचारविनिमय १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी होणार सहभागी

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २७ : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) यांच्या वतीने मंगळवारी (ता. २९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकार सहभागी होणार आहेत. अशी माहिती माथाडी ट्रान्सपोर्टचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी (ता. २७) काळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

माथाडी पदाधिकारी मेळाव्याचे उ‌द्घाटन मंगळवारी दुपारी २ वाजता मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. माथाडी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच कामगारांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर विचारविनिमय होणार आहे. २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उ‌द्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजनांवरही यावेळी चर्चा केली जाणार असल्याची माहिती अनुप मोरे यांनी दिली.

त्याचबरोबर बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात पिंपरी-चिंचवड परिसरातील क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना ऑन-द-स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाचवी पासपासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्व पात्र युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तसेच, मेळाव्यात सहभागी होऊनही तात्काळ नोकरीची संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी 'जॉब कार्ड' उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा