Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २० सप्टेंबर, २०२६

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव मगर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २० सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव आणि गौरी गणपती उत्सवाच्या भक्तीमय वातावरणात महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव मगर यांचा वाढदिवस देखील भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात आज पार पडला. सांगवी येथील सकाळी बाबुरावजी घोलप महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळांचे संस्थापक बाबुरावजी घोलप यांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या समवेत श्री. गणरायाची महाआरती करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव (प्रशासन) जाधव साहेब, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रजिस्टार प्रमोद जाधव साहेब, प्राचार्य डॉ. पंडित शेळके सर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर महिला शहराध्यक्षा रुपालीताई गोरे यांच्या व महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित यांच्या निवासस्थानी, तसेच भोसरी गावचे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास खोंडे (पाटील) यांच्या निवासस्थानी गणरायाची आरती संपन्न झाली. महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा जेष्ठ नेते हरिदास शिंदे व श्री.बबनराव पंडित यांच्या शुभहस्ते अशोक मगर यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा कोषाध्यक्ष श्री तानाजी वाळुंजकर यांनी केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा उपाध्यक्ष,भाऊसाहेब यादव पुणे जिल्हा संघटक अशोक पंडित आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रूपालीताई गोरे शुभेच्छापर मनोगत व्यक्त करुन अध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक मगर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की समाजाच्या कार्यक्रमांमध्ये, समाजा विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी भूमिका व्यक्त केली.

आभार पिंपरी शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी उपस्थित सत्कारमूर्ती आणि सन्माननीय पदाधिकारी यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रमाचे गोड सांगता करण्यात आले यावेळी उपस्थित राज्यकारणी सदस्य अंकुशराव जाधव पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंदिर अध्यक्ष मुरलीधर (नाना) रायकर,पुणे जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित, पुणे जिल्हा सचिव नितीन कुटे, पुणे जिल्हा सहसचिव बळीराम (आबा) मंडलिक, पुणे जिल्हा संघटक श्री संतोष गोरे, अनिल कारेकर, पिंपरी चिंचवड शहर सचिव, मनोज विळस्कर, पिंपरी चिंचवड शहर संघटक राहुल जगताप, भोसरी विभागीय अध्यक्ष गणेश भोंडेकार, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा माजी महिला अध्यक्ष अनिताताई मगर, पुणे जिल्हा महिला संघटक वंदनाताई जाधव , महिला कोशाध्यक्ष वनिताताई कारेकर, पिंपरी चिंचवड शहर महिला शिल्पा ताई शिंदे, सुनिताताई पंडित उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा