Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

१४२.२३० ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर


अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादाला यश; १५ लाखांहून अधिक किमतीच्या अमली पदार्थांशी संबंधित प्रकरण

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ :  सुमारे १५ लाख १२ हजार ३०० रुपये किमतीच्या १४२.२३० ग्रॅम एमडी ड्रग्जशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणात पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. 

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१/२०२६ अन्वये अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियमाच्या (एनडीपीएस कायदा) कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशानुसार, या प्रकरणात कथितरीत्या जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचे वजन १४२.२३० ग्रॅम असून, त्याची किंमत १५ लाख १२ हजार ३०० रुपये आहे.

या प्रकरणातील आरोपीला २४ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील बिलारा येथे अटक करण्यात आली होती. मात्र, कथित अमली पदार्थांची जप्ती इतर आरोपींकडून करण्यात आली होती. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने याच मुद्द्यावर भर देत आरोपीकडून थेट कोणताही अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नसल्याचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा पुराव्यांवर प्रश्न आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राजेश राजपुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा आधार घेत न्यायालयासमोर बाजू मांडली. अर्जदाराचा कथित अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध जोडण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याची भूमिका तपासण्याची गरज असल्याचे बचाव पक्षाने नमूद केले.
दरम्यान, अभियोजन पक्षाने जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीचा कथित अमली पदार्थ पुरवठा साखळीतील सहभाग, आर्थिक व्यवहार आणि पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करत जामीन नाकारण्याची मागणी करण्यात आली. 

५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर नियमित जामीन मंजूर केला. तसेच, न्यायालयाने आदेशात नमूद केलेल्या इतर अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राजेश राजपुरोहित, अ‍ॅड. प्रीती धुळे, अ‍ॅड. महेश मार्कड, अ‍ॅड. रोहित घोलप, तनया जगदाळे, प्रणिल चौधरी आणि विपुल पांडे यांनी बाजू मांडली असल्या बाबत माध्यमांना माहियी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा