महापालिका प्रशासन अश्याच प्रकारे गरज व मागणी नसताना कोट्यावधी रुपयांची उधळन करीत राहणार ! त्यामुळे महानगरपालिका निवडणुका लवकरात लवकर घ्या ___ वसंत मोरे
| सांगावा न्यूज | पुणे. दिनांक १६ : तीन वर्ष झाले राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे महापालिका प्रशासन अधिकारी दोन्ही हातांनी जनतेच्या पैशांची उधळण करीत असून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह येवून सांगितले. पुणे जिल्ह्यातील भूगाव- बावधानच्या फॉरेस्ट मध्ये १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली जनावरांची गॅस शवदाहिनी वापराविना पडून आहे. शिवाय यासाठी वापरात येणारे व्यावसायिक गॅस सिलेंडर देखील तसेच धूळ खात पडले आहेत. गांभीर्यची बाब म्हणजे चार महिन्यापूर्वी ट्रायल साठी जाळलेले २ मृत घोडे आजपर्यंत शवदाहिनीतच अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडून आहेत याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी केला आहे.
पक्षी व प्राणी यांच्या उपचारासाठी रेस्क्यू प्लांट राज्य शासनाने बावधन येथे निर्मिती केलेला तो चांगला उपक्रम आहे. परंतु रेस्क्यु किंवा उपचारासाठी येथे आणलेले प्राणी आणि पक्षी कधी कधी उपचार दरम्यान दगावतात. त्यांचे योग्य अंत्यसंस्कार करावेत म्हणून एक कोटी रुपये खर्च करून उभारलेले प्राणी व पक्षासाठी गॅस शवदहिनी मात्र वापरात नाही. उलट मृत झालेले प्राणी आणि पक्षांचे अंत्यविधी हे लाकडावरील अग्निवर जाळून केले जातात. मग कोट्यावधी रुपये खर्च करून आणलेल्या शवदाहिनीचा उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पैशाचा वापर फक्त कॉन्ट्रॅक्टर शी व्यवहार करून वस्तू खरेदी केल्या जातात. यात भ्रष्टाचार होत असल्याचा अरोब देखील वसंत मोरे यांनी केला आहे. यामध्ये ठेकेदार की पुणे महानगरपालिका ? कोण सहभागी आहे तसेच विद्युत विभागतील दोषींवर देखील कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मोरे यांनी केली. याशिवाय जोपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत महापालिका प्रशासन अश्याच प्रकारे गरज आणि मागणी नसताना कोट्यावधी रूपये उधळत राहणार असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा