सत्ता नसताना पुर्ण वेळ यंत्रणा राबवणारे लोकप्रिय नेत्रुत्व म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर ___ भगवान बांगर ( शिवसेना धाराशिव )
| सांगावा न्यूज | धाराशिव प्रतिनिधी. दिनांक १९ : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिनांक १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दिल्लीतील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात ही भेट होती. यामध्ये प्रामुख्याने निवेदनात नमूद केल्याप्रमणे १. उमरगा हायवेचे काम त्वरित पूर्ण करावे २. धाराशिव बायपासचे कार्य तात्काळ करावे ३.धाराशिव लोकसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी केंद्रीय रोड फंड मधून(CRF)) भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करावा ४. लातूर - टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे टेंडर लवकर काढावे या प्रमुख मागण्या असलेले लेखी निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केल्याची माहिती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मध्येमांवर पोस्ट केली.
"धाराशिव जिल्ह्याचे विश्वसनीय नेतृत्व ज्या नेत्रुत्वाने कधीच जात पात धर्म पंथ बघुन काम केले नाही सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार या कल्पनेनेच काम केले पुर्वी आपल्या जिल्ह्यातील खासदार कोण हेच कळत नव्हते आज जिल्यातील 11 लाखा पेक्षा जास्त लोक स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शी जोडली गेलेली आहेत सत्ता नसताना पुर्ण वेळ यंत्रणा राबवणारे लोकप्रिय नेत्रुत्व म्हणून आज त्यांची ओळख देशभर आहे" ___ भगवान बांगर ( शिवसेना धाराशिव )


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा