Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

अतिक्रमण बांधकामे आणि आरक्षणांमध्ये बेकायदेशीर उभारलेल्या दुकानांवर महानगर पालिकेची कारवाई

बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बेकायदेशील आश्रयस्थळे उध्वस्त करण्याच्या मोहीमेला अखेर सुरूवात झाली ___ आमदार महेश लांडगे 
बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बेकायदेशील आश्रयस्थळे उध्वस्त करण्याच्या मोहीमेला अखेर सुरूवात झाली ___ आमदार महेश लांडगे 

राष्ट्रहितासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘‘नो कॉम्प्रमाईज’’____ आमदार महेश लांडगे 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १९ : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात मागील आठवड्यात भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीची धग राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये आजही दिसून येत आहे. चिखली भंगार दुकाने असलेल्या परिसरातील अनिधिकृत बांधकामे व आरक्षित जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली दुकाने यावर आज पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये रस्त्यावर बांधलेली दुकाने व पत्रा शेड्स जमीनदोस्त करण्यात आले.

चिखली-कुदळवाडी भागातील अनधिकृत भंगार दुकानांमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बेकायदेशील आश्रयस्थळे उध्वस्त करण्याच्या मोहीमेला अखेर सुरूवात झाली. या भागातील रस्त्यांवर अतिक्रमण केलेली बांधकामे आणि पत्राशेड यासह महानगरपालिका आरक्षणांमध्ये बेकायदेशीरपणे उभारलेली दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईचे स्वागत. यावर भोसरीत आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यापैकी, राष्ट्रहितासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘‘नो कॉम्प्रमाईज’’  या वाक्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

" पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागपूर येथील महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये केली होती. राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दोन दिवसांपूर्वीच दिले होते. बुधवारी ‘ॲक्शन’ झाली. चिखली-कुदळवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सर्वातोपरी सहकार्य करावे. तसेच, पोलीस प्रशासनाने कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी आणि आगामी काळात बांगालादेशी, रोहिंग्यांची आश्रयस्थळे जमीनदोस्त करण्याची मोहीम तीव्र करावी, अशी प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांची भावना आहे " ___ आमदार महेश लांडगे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा