सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दिनांक १४ : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे बहाण्याने ऑनलाईन ७१,०५,०००/- रुपयांची आयटी मध्ये काम करणारे इसमाची फसवणुक करणाऱ्या रशियन आरोपीला सायबर पोलीस ठाणेकडुन गोवा राज्यातून ताब्यात घेतले असून कसून चौकशी अंती गुन्हा उघडकीस आला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाकड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात आलेल्या जाहीरातीवर क्लिक केले असता लगेच आरोपीने संपर्क शेअर मार्केट मध्ये पैसे कमाविण्या संदर्भात आमिष दाखविले. आरोपीने त्याच्या फेक वेबसाईटवरुन शेअर मार्केटचे स्टॉक आणि आयपीओ ट्रेडींग करण्यास सांगुन बैंक अकाऊंटवर एकूण ७१,०५,०००/- रुपये भरण्यास सांगुन सांगितले व फसवणुक केली असल्याच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला गेला. त्यानुसार सायबर पोलीस ठाणे मार्फत तपास चालु आहे.
दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्हगुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बैंक अकाऊंटवर घेतली असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने तपास करीत असताना कॉसमॉस बैंकेच्या अकाऊंट मधून दि.२६/११/२०२४ रोजी २८ लाख रुपये आरोपी यांनी घेतले असल्याचे स्पष्ट झाले. त्याअनुषंगाने पोउनि, पोमण, पोउनि. कातकडे यांची पथकांनी तपास केला. यामध्ये परकिय नागरीक टोनी व मार्क या नावाच्या आरोपींनी सदर अकाऊंट गोवा येथून चालविले असल्याबाबत तांत्रिक व इतर माहीती प्राप्त झाली. त्यावरुन तात्काळ वरिष्ठांच्या परवानगीने मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे यांना तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि. प्रविण स्वामी व पथकास गोवा येथे पाठविले असता त्यांनी गोवा येथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने कौशल्यपूर्वक तपास करुन मचलमज, मन्ड्रेम पेरनम, गोवा येथुन परकिय रशियन नागरीक Tony @ Anatoliy Mironov S/O Alexandrovich Mironov वय ३० वर्षे रा. 32, Leninskay, Orenburg City, Russia सध्या राहणारे. घर नं. १३५ हनुमान मंदीराजवळ, मधलमज, मन्ड्रेम पेरनम, गोवा यास ताब्यात घेतले. तपासात सुरुवातीला त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याने त्यास गोवा येथुन सायबर पोलीस ठाणे येथे आणुन त्याचा कौशल्यपुर्वक तपास केला. त्यानंतर त्याने सदरचा गुन्हा त्याचा मार्क नावाचा साथीदार तसेच एक पुण्यातील इसम ज्याचे नाव श्रेयश आहे याच्या सोबत राहून सदर फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे.
त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने Tony @ Anatoliy Mironov S/O Alexandrovich Mironov व श्रेयश संजय माने यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची गुन्हयाचे तपासकामी मा. न्यायालयात हजर करुन दि. १५/१२/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी नामे श्रेयश माने हा त्याचे मित्रांकडून गेमींगच्या नावाने अकाऊंट व त्यांचे लिंक मोबाईल नंबर घेवुन विमानाने गोवा येथे जावुन सदर रशियन आरोपी यांना पुरवुन त्यांचेसोबत सदरचे गुन्हे करीत होता. दाखल गुन्हयाचा पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे करीत आहे.
तपासामध्ये अटक रशियन आरोपी हा मलेशिया मध्ये गेल्याबाबत तसेच त्याने गुन्हयातील अकाऊंट मलेशिया या देशात चालविले असल्याची माहीती मिळुन आली आहे. तसेच त्याचा गुजरात पोलीस त्यांचेकडील दाखल असलेले दोन गुन्हयामध्ये मागील दोन महीन्यापासुन शोध घेत असल्याची माहीती मिळाली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोनि, रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमण, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, दिपक माने, परशुराम चव्हाण, सुरज जाधव, सुरंजन चव्हाण, अनिकेत टेमगिरे, महेश मोटकर, सचिन घाडगे, निलेश देशमुख, दिपाली चव्हाण, मोनिका चित्तेवार, स्मिता पाटील, दिपाली टोपे सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा