जया किशोरी यांच्या अमृतवाणीने पहिल्याच दिवशी अवघा परिसर झाला कृष्णमय !
| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक २५ : भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी भव्य-दिव्य आयोजन केलेल्या तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथेला धडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांचा तुफान प्रतिसादात विश्व विख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथेचे पहिले पुष्प गुंफताना अवघा वाकड परिसर अक्षरशः कृष्णमय झाला होता.
दरम्यान, सोमवार (दि.२४) रोजी सायंकाळी मुंबई बंगलोर महामार्गानजीक वाकड येथील मोकळ्या मैदानात तीन दिवसीय श्री कृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ मोठया उत्साहात करण्यात आला. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तिरसाचा सोहळा साकार होत आहे. कथेच्या शुभारंभ प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, अमर साबळे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रणजित कलाटे तसेच राम वाकडकर मित्र परिवारासह शहराच्या विविध भागातील भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. भक्तांच्या अभूतपूर्व गर्दीने संपूर्ण मैदान खचाखच भरून गेले होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा