Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

सरस्वती सहकारी सोसायटी (म्हाडा) मोरवाडी येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

 

| सांगावा न्यूज | २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाला हक्काचे संविधान मिळाले आणि भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम, लोकशाही प्रधान देश बनला, विविध जाती, धर्म आणि पंथांनी नटलेला आपल्या विविधतेत एकता हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. संविधानाचा आदर आणि लोकशाही मूल्यांची जपणूक हे कर्तव्य एक भारतीय नागरिक म्हणून पार पाडण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. आज दिनांक २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त सरस्वती सहकारी गृह रचना मोरवाडी येथील सोसायटीत मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पथविक्रेता समिती सदस्य मा.किसन उर्फ माऊली भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सोसायटीतील नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी म्हणून लहान मुलांचे गॅदरिंग या ठिकाणी भरवण्यात आले होते. यावेळी सरस्वती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीचे चेअरमन जिजाबराव जाधव व सोसायटीचे सचिव राहुल पवार त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भंडार अधिकारी माननीय श्री.बुधा दाभाडे साहेब तसेच विद्युत अभियंता माननीय विशाल रेंगडे, सोमनाथ शिंदे, संतोष अवधूत, शिवाजी माने, पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मा.अमोल चौगुले यांच्यासह सोसायटीतील सर्व नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमा वेळी राष्ट्रगीतासह व लहान मुलांच्या गॅदरिंग सह  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा