फुटपाथ या कारसाठी बांधला आहे की चालणाऱ्या लोकांसाठी?
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक २४ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव काळेवाडी फाटा येथे थेरगाव कडून औंध कडे जाणाऱ्या मार्गावर, काळेवाडी फाटा ब्रीज खालील स्वच्छतागृह समोरील बाजूस चालणाऱ्या नागरिकांसाठी बांधलेल्या या फुटपाथवर गेली अनेक दिवसांपासून लाल रंगाची कार फुटपाथवर पार्किंग केली जाते त्यामुळे लोकांना चालण्यासाठी फुटपाथ शिल्लक राहत नाही. या कारला वळसा घालून खाली रस्त्यावर उतरवून वाटसरुंना मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांपासून चालणाऱ्या लोकांना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक वेळा या फुटपाथवर अनधिकृत कार पार्किंग केली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून सुद्धा सबंधित कारवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे कार मालक आणि संबंधित विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही अर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याची भावना सामान्य नागरिक बोलत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी सबंधित परिस्थितीमुळे जर अपघात झाला आणि कुणाच्या जीविताला हानी पोहचली तर याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि कार मालक असतील अशी चर्चा नागरिक करीत आहेत. सदर ठिकाणी दादागिरी करून, दमदाटी करून महानगरपालिकेच्या फुटपाथवर कार पार्किंग केली जात असलेली कार आणि कार मालकावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून लोकांसाठी फुटपाथ मोकळा करावा ही मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा