नवी सांगवी येथे सखोल स्वच्छता अभियान संपन्न
| सांगावा न्यूज | नवी सांगावी, दिनांक १ जून : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील PWD मैदान साई चौक ते डायनासोर गार्डन नवी सांगवी दरम्यान बेसिक्स टीम द्वारा सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच स्वच्छतेची रॅली काढण्यात आली. बेसिक्स टीम यांस कडून सखोल स्वच्छता अभियाना अंतर्गत सर्व सफाई मित्र कर्मचारी, बेसिक्स कर्मचारी व परिसरातील उपस्थित नागरिक यांनी सर्व १०० मीटर परिसराची सखोल स्वच्छता केली. यामध्ये साफसफाई, झाडांचा पालापाचोळा, वाढलेले गवत, कागद, पुठ्ठा, प्लास्टिक इ. सर्व कचरा स्वच्छता मोहिमेत गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांना स्वच्छते बाबत महत्त्व पटवून देण्यात आले तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत घोषणा देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
सदर डीप क्लिनिंग प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बेसिक्स मुनिसिपल वेस्ट वेंचर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ मे २०२६ रोजी ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मध्ये राबविण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रवी लांडगे, ह क्षेत्रीय अधिकारी मा. सौ.पूजा दूधनाळे, व सहाय्यक आरोग्य अधिकारी मा.अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक, मा.दीपक कोटीयाना, आरोग्य निरीक्षक सौ.स्नेहल सोनवणे, वॉर्ड क्र. ३२ चे आरोग्य निरीक्षक संदीप राठोड, आरोग्य मुकादम राजाराम राखपसरे, तसेच वड मिशन सो चर्च ऑफ गॉड असोसिएशन ची पूर्ण टीम उपस्थित होते. तसेच बेसिक्स टीम, शुभम उद्योग सफाई कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा