Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २ जून, २०२६

अधिक मास निमित्ताने काळेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा

विठ्ठलराज भजनी मंडळ व नवनाथ दादा नढे मित्र परिवार यांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन

| सांगावा न्यूज | काळेवाडी, दिनांक २ जून : पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी येथील विष्णूराज मंगल कार्यालय, ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे अधिक मासाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. दिनांक २४ मे ते ३१ मे २०२६ रोजी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती व भजन, सायंकाळी हरिपाठ व भजन , रात्री कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने संपूर्ण सप्ताहामध्ये सहभाग नोंदविला.

सप्ताहादरम्यान वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विठ्ठल-रुक्मिणी नामस्मरण, हरिपाठ आणि सामूहिक भजनाने व रात्री कीर्तन उत्साहाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध कीर्तनकारांच्या मार्गदर्शनातून समाजप्रबोधनाचे संदेश या अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसुरे यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. किर्तन संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक मास हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जात असल्याने या परंपरेनुसार अधिक मास निमित्ताने या अखंड हरिनाम सप्ताहाला काळेवाडी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन विठ्ठलराज भजनी मंडळ व नवनाथ दादा नढे प्रतिष्ठान व समस्त नढे परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

-------------------SANGAVA NEWS-------------------

Official Contact Number : 8263083329

Email : sangavanews19@gmail.com

विनय सोनवणे (MJMC) संपादक, सांगावा न्यूज

_______________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा