महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचे लक्ष जावे आणि याकडे गांभीर्याने उपया योजना व्हावी यासाठी आज दिनांक १ सप्टेंबर रोजी शहरात महिलांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. देशात व राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील जागरूक नागरिक अससेल्या महिलांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी १० वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथून या आक्रोश मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. खंडोबा माळ, आकुर्डी- आकुर्डी गावठाण - म्हाळसाकांत चौक - लोकमान्य हॉस्पीटल प्राधिकरण ते तहसील कार्यालय - निगडी असा मोर्चा मार्ग असेल.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामाजिक व पुरोगामी राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येवून या मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटनासह सामान्य नागरिकही सहभागी होणार आहेत. आपल्या लेकी बळींच्या संरक्षणासाठी सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले . अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री सतीश काळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा