संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मेट्रो प्रशासनावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा___ मारुती भापकर
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २५ : निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराचे काम चालू असताना दरम्यान होत असलेल्या खोदकाम आणि इतर कामामुळे पाणीपुरवठा करारी जलवाहिनी फुटल्यामुळे फुलेनगर, रामनगर, चिंचवड येथील काही भागातील पाणीपुरवठा खंडित झाला असून आजतागायत पाणीपुरवठा सुरळीत झेलला नाही. सदर घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकं पाण्याविना वंचित असून संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन देखील अजून पूर्ण क्षमतेने या पूर्ण भागात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. या हलगर्जीपणामुळे जी जलवाहिनी फुटली त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्यामुळे सबंधित अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सबंधित प्रशासनाला इमले द्वारे कळवले आहे. यासंदर्भात सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे :
मारुती साहेबराव भापकर
काली माता मंदिरा शेजारी
मोहन नगर चिंचवड पुणे 19
दि.26/09/2025
मा श्री शेखर सिंह
आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे18
विषय:-मेट्रो प्रशासनाच्या गलथान,बेजबाबदार कारभारामुळे अ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील विस्कळीत पाणीपुरवठा व महापालिकेच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा याची चौकशी होऊन योग्य कारवाई होणे बाबत.
मा महोदय,
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे पुणे मेट्रोच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा वाहिनी मेट्रोच्या कामात फुटली. या वाहिनीचे काम सकाळपासून सुरू आहे.
नवरात्र उत्सवाचे दिवस आहेत.दिनांक 24 सप्टेंबर मोहन नगर महात्मा फुलेनगर दत्तनगर विद्यानगर रामनगर काळभोर नगर चिंचवड स्टेशन आदी विभागात पाणी पुरवठा करण्यात आला होता. काल 25 सप्टेंबरचा दिवशी पाणीपुरवठा होत नाही. आज सकाळी या विभागात पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र पाणीपुरवठा झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी आज 4.30 वाज. पर्यंत पाणी येईन असे सांगितले होते.
मात्र आत्ता 5.00 वाजता मोहननगरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला असून उर्वरित महात्मा फुलेनगर दत्तनगर विद्यानगर रामनगर आदी भागाचा पाणीपुरवठा केव्हा सुरू होणार याबाबत आपल्या अभियंत्यांशी उपअभियत्यांशी चर्चा केली असता कुठले समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून येत नाही.
पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान गैरजबाबदार कारभाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मेट्रो प्रशासनावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची ही चौकशी करून योग्य ती उचित कारवाई व्हावी ही विनंती
कळावे
आपला विश्वासू
मारुती भापकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा