भूम शहर शिवसेना पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान
| सांगावा न्यूज | भूम, दिनांक १४ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार दिनांक १० फेब्रुवारी रोजी भूम येथे संपन्न झाला. संजय नाना गाढवे प्रतिष्ठान व भूम शहर शिवसेना पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम करून दाखवलेली एकजूट कामी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
विजयी सदस्यांमध्ये जि. प. सदस्य जयश्री काळे, विजयमाला मारकड, पं.स. सदस्य प्रशांत मुंडेकर, पूजा ढगे, साधना सुबुगडे, श्रीलता लोखंडे, कृष्णा गोयकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भूम नगर परिषद नगरसेवक, बाजार समितीचे माजी सभापती नीलेश शेळवणे, माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, जांबचे सरपंच समाधान भोरे , विशाल अंधारे, उद्योजक भाऊसाहेब मारकड, बालाजी काळे, उमेश नायकिंदे, अतुल शेळके, दत्ता नलवडे, शंकर सुबुगडे, खंडू गोयकर, किशोर अंधारे, संतोष लोखंडे, नगरसेवक भाग्यश्री माने, रीमा शिंदे, अलका शिर्के, राजकन्या सुबुगडे, अभिजित शेटे, दत्ता काळे, दिलीप शिर्के, रामभाऊ बागडे, रेवण चोरमले, संदीप खराडे, जयसिंग गोपने, आजिनाथ चोरमले, हरिभाऊ कांबळे, नानासाहेब दळवे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या एकूण पाच गटांपैकी तीन ठिकाणी आणि पंचायत समितीच्या १० गणांपैकी पाच गणांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला आहे. उपस्थित मान्यवरांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन केले.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा