|सांगावा न्यूज| थेरगाव, दिनांक १४ : पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेची थेरगाव १६ नंबर येथील नागुभाऊ बारणे शाळेमध्ये खाऊचे वाटप. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड व पिंपरी चिंचवड पत्रकार परिषदेतर्फे बालदिनाचे औचित्य साधून येथील शाळेतील मुलांना खाऊच्या स्वरूपात फळे वाटप करण्यात आले. आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत म्हणणारे पंडित जवारलाल नेहरू यांची जयंती तसेच आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती आज नागुभाऊ बारणे प्राथमिक शाळा,मुले संतोषनगर थेरगाव येथे विविध कला गुण दर्शनाने साजरी करण्यात आली यासाठी आमच्या शाळेत विद्यार्थांना खाऊ वाटप करून आजचा बाल दिन साजरा केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांचे मुख्याध्यापिका प्रतिभा बनकर मॅडम यांनी आभार मानले व समाधान व्यक्त केले. महापुरुषांचे विचार प्रकट करून सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी भाषणे केली. आज दिनांक १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केळी व चिक्की या खाऊचे वाटप केले.
यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती आणि बाल दिनानिमित्त लहान लहान विद्यार्थिनी आपल्या शैलीत भाषणे केली. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करून उपस्थित सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत केले. यावेळी पत्रकार म्हणून सांगावा न्यूज आणि दैनिक राज्य लोकतंत्र ने केलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल शिक्षकांनी आभार मानले. आजच्या दिनी येथील लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून आला यातून येथील शिक्षक शिक्षिका यांची कार्यप्रणाली विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असल्याचे पत्रकार बांधवांनी अनुभवले.
यावेळी गणेश मोकाशी ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ), विनय सोनवणे ( अध्यक्ष : डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड व संपादक : सांगावा न्यूज ), सागर सूर्यवंशी ( सचिव डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड ), महावीर जाधव ( माजी अध्यक्ष: डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड ), संतोष गोतावळे ( उपाधक्ष : डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड ), संभाजी बारबोले ( पत्रकार ), माऊली भोसले ( नगर सदस्य : पथ विक्रेता समिती पिंपरी चिंचवड ) यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये मा. प्रतिभा बनकर मॅडम ( मुख्याध्यापिका ),
भाडळे कीर्ती ( शिक्षिका ), जगनाडे मॅडम, यादव मॅडम, गव्हाणे मॅडम, लष्करे मॅडम कोकणे सर, घोडके सर, नरवाडे सर, साळवी मॅडम, राजे मॅडम या मान्यवर शिक्षकांचे सहकार्य लाभले.













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा