Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर-तळवडे मध्ये मोफत आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी

 

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक २० : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच लोकमान्य हॉस्पिटल्सच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेषतः महिलांना स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुपिनगर येथील प्रबोधनकार ठाकरे प्रशाला येथे .गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ५.३० या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले. या स्तुत्य उपक्रमाला रुपीनगर तळवडे परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.

मुख्य आकर्षण: या आरोग्य शिबिरात जवळपास २५७ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि विविध कर्करोगासह अन्य आजारांची तपासणी करून घेतली. शिबिरातील सुविधा आणि तपासणी: शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG), ऑर्थोपेडिक तपासणी यांसारख्या सामान्य तपासण्यांसह खालील महत्त्वाच्या सेवा मोफत पुरवण्यात आल्या. स्त्रीरोग आणि कर्करोग तपासणी: स्तन कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, लिगामेंट टीयर. प्रगत शस्त्रक्रिया आणि उपचार: ऑर्थोस्कोपी (डायग्नोस्टिक), ACL रिपेअर आणि मेनिसेक्टॉमी, कर्करोग शस्त्रक्रिया, किमो थेरपी, रेडिएशन, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया (उदा. हर्निया, अपेंडिक्स, थायरॉईड). अस्थिरोग आणि मणका: गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, लिगामेंट टीयर, फ्रॅक्चर्स, मणक्याच्या शस्त्रक्रिया आणि सांधे प्रत्यारोपण यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, शितलताई वर्णेकर, संगीता ताई भालेकर, संगीता ताई गोडसे, वैशालीताई भालेकर, गजानन भाऊ वाघमोडे, नंदू तात्या भालेकर, संदीपभाऊ जाधव, श्यामकांत दादा सातपुते, रविराज शेतसंधी, संतोषभाऊ निकाळजे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या शिबिराच्या आयोजन मा.नगरसेवक श्री. शांताराम कोंडीबा भालेकर उर्फ एस.के.बापू आणि आरोग्यदूत मनेश पंडित भालेकर यांनी केले. यांच्या सक्रिय सहकार्यातून प्रभागातील महिला माता-भगिनींना उत्तम आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर