शिवसेना पक्षाच्या कार्याचा प्रसार घराघरा पर्यंत पोहोचवणार __सदाशिव गव्हाणे
| सांगावा न्यूज | लातूर : लातूर तालुक्यातील सलगरा बु ग्राम पंचायत कार्यालयाचे विद्यमान सदस्य व मा. तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव सोपान गव्हाणे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख( लातूर ग्रामीण विधानसभा ) पदी निवड करण्यात आली.
सदर निवड ही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने ,शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब व संजयजी मोरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या दाने यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदाशिव गव्हाणे यांनी सामाजिक , राजकीय, धार्मिक आरोग्य,शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून गावातील ,तालुक्यातील व शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. त्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, महापुरुषांच्या जयंती उत्सव, रक्तदान शिबिर,अन्नदान , रोजगार मेळावा , स्वच्छता अभियान , यासारखे विविध उपक्रमाचे आयोजन केले .
सदाशिव गव्हाणे म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य एका सामाजिक कार्यकर्त्याला शहरावर कार्य करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी शिवसेना पक्षातील सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो, आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये लातूर तालुक्यातील व शहरातील शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देणार व शिवसेना पक्ष वाढीसाठी मोठ्या संख्येने प्रयत्न करणार, तसेच शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने समाजातील सर्व सामान्य जनतेची कामे पूर्ण करणार असे प्रतिपादन सदाशिव गव्हाणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा