सांगावा न्यूज | पुणे | दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ : कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. त्यानिमित्त आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची नियोजन व आढावा बैठक झाली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी, रविवारी कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये सकाळी ११ वाजता हा सोहळा होत आहे.
ग्रामीण महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट पत्रकारितेबरोबरच समाजासाठी देखील अनेक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याचा राज्य पातळीवर सन्मान व्हावा, त्यांचं कौतूक व्हावं यासाठी प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड केली जाते या कार्यक्रमाला अधिकाधिक पत्रकारांनी सहभागी व्हावे या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कार्यक्रम नियोजनबद्ध कसा करता येईल त्यासाठी नियोजन करण्यात आले.
पुणे येथील दैनिक राज्य लोकतंत्र कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीला मार्गदर्शक व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशी, जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनय सोनवणे, सचिव सागर सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा