कपबशी व छत्रीला मतदान करून यंदा स्व.अजित दादांना श्रद्धांजली वाहू,मांडवगण फराटा येथे नागरिकांचा निर्धार
| सांगावा न्यूज | शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील धगधगत नेतृत्व तसेच जनतेच्या मनातील लोकनेता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत तशीच आहे असे घोडगंगा सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे हे एक शिरूर तालुक्यात असे नाव आहे की जे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर असणार नेतृत्व,स्व.अजित दादा पवार यांच्या तालमीतील जुने खंबीर नेते असे दादा पाटील हे कपबशी व छत्री या चिन्हावर जिल्हा परिषद- पंचायत समिती २०२६ निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडी हा पॅनल बनवून या पॅनलमध्ये श्री विजेंद्र गद्रे (वडगाव रासाई पंचायत समिती गण, चिन्ह- छत्री) श्री दादा पाटील फराटे (मांडवगण फराटा- वडगाव रासाई जिल्हा परिषद गट,चिन्ह- कपबशी),व सौ.दिपाली महेंद्र नागवडे(मांडवगण फराटा गण पंचायत समिती) असा पॅनल घेऊन उतरले आहेत. या पॅनलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावेळी निवडून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी हवे तसे मतदारसंघात विकास कामाची छाप पडताना दिसले नाही किंवा काम न केल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी या मतदारसंघात दिसून आली आहे आणि त्यामुळेच स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊ आशा भावना गोरगरीब,शेतकरी, कामगार वर्गातून मोठ्या प्रमाणात दिसून आल्या व या मतदारसंघात यावेळचे वातावरण दिसले त्याचबरोबर आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने या पॅनलला मांडवगण फराटा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांची शोकसभा आटपल्यानंतर जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.यावेळी या पंचायत समिती -जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते आणि नागरिकांसह शिरूर हवेलीचे आमदार मा.माऊली आबा कटके मा.सुधीर फराटे व मांडवगण फराटा गावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.समीक्षा फराटे पाटील,मा.अक्षय पाटील फराटे,मा.बाळासाहेबभाऊ फराटे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे पाटील राष्ट्रवादीचे बाबासाहेब फराटे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष व आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक माऊली उर्फ किसन रामा भोसले, सागर चव्हाण, शिरूर तालुक्याचे उपाध्यक्ष सुहास भोसले, मॅनेजर भोसले, सुजल काळे महिला आघाडीच्या सीमा पवार,शोभा काळे आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा देण्यात आला. तसेच स्वाभिमानी विकास पॅनलच्या तीनही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा