Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

अजितदादांच्या स्मरणार्थ १४ रोपांचे वृक्षारोपण करून पत्रकारांनी व्यक्त केला शोक



पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी शोकसभा घेऊन दादांना वाहिली श्रद्धांजली 
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ८ फेब्रुवारी : महाराष्ट्राचे कणखर आणि धुरंदर नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. शोक व्यक्त करण्यासाठी आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी आज थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात शोकसभा घेतली. अजितदादा पवारांच्या कर्तृत्वाचे स्मरण राहावे म्हणून १४ रोपांचे वृक्षारोपण करून आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर नितांत प्रेम होते. त्यांनी शहराचा दैदिप्यमान विकास केला. त्यांच्या असे अकाली जाण्याने शहरावर शोककळा पसरली. शहराच्या MH १४ प्रमाणे आणि जिल्ह्यातील १४ तालुके असे प्रतिकात्मक साम्य लक्षात घेता दादांचे स्मरण व्हावे म्हणून आज शोकसभा झाल्या नंतर १४ रोपांचे वृक्षारोपण उपस्थित पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. शोकसभेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यामध्ये गणेश मोकाशी (महाराष्ट्र उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद), चिराग फुलसुंदर (जिल्हा संघटक) अनिल वडघुले (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ) विनय सोनवणे (अध्यक्ष, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड) सागर सूर्यवंशी (सचिव) संतोष गोतावळे (उपाध्यक्ष) सिद्धांत चौधरी (सदस्य), हनुमंत रामदासी (सदस्य) संजीव सूर्यवंशी (सदस्य) रमेश साठे (सदस्य) इत्यादी पत्रकार उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आपल्या मनोगतात दादांच्या कार्याची आठवण करून शोक व्यक्त केला. सार्वजनिक पसायदान पठण केले आणि त्यांनंतर वृक्षारोपण करण्यात आले.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा