Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे "निर्भय कन्या अभियान" एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

| सांगावा न्यूज | महाविद्यालयात बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी "निर्भय कन्या अभियान "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी "विद्यार्थी विकास मंडळ" यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. संगीता जगताप , उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, प्राचार्य डॉ. शैलजा सांगळे तसेच श्री. शुभम भालेराव, कराटे अकॅडमी हिंजवडी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे व विद्यार्थी विकास मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकासअधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी केले. तसेच निर्भय कन्या अभियान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ग्रामीण भागातील मुलीसाठी व समाजातील वंचित घटकातील विद्यार्थिनीचा आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास विकसित करण्यासाठी निर्भय कन्या अभियान निर्माण केले आहे. या अभियानाचा मुलींना फायदा होणार आहे. अजूनही समाजामध्ये अनेक मुलींना भीती, अन्याय आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो म्हणून निर्भय कन्या अभियान ही काळाची गरज आहे. निर्भय कन्या अभियान फक्त धाडसी मुलगी नव्हे तर आत्मविश्वासाने भरलेली स्वतःची हक्क जाणवणारी आणि अन्याय विरुद्ध आवाज उठवणारी मुलगी या निर्भय कन्या अभियानाच्या माध्यमातून तयार झाली पाहिजे. असे मत प्राध्यापक डॉ. विजय घाडगे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. संगीता जगताप यांनी सांगितले की या "निर्भय कन्या अभियाना" मधून मुलींचा व्यक्तिमत्व विकास होत आहे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने निर्भय कन्या अभियान ही योजना प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात आली आहे. तसेच आता गरज आहे मानसिकता बदलण्याची या निर्भय कन्या अभियानामध्ये मुलांनी ही सहभागी झाले पाहिजे. मुलींना कमकुवत समजण्याऐवजी त्यांना संधी देणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली जाते. तसेच आमच्या महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान प्रत्येक वर्षी आम्ही ही योजना प्रभावीपणे राबवत आहे असे प्राचार्यांनी सांगितले. 

महाविद्यालयात एकूण 110 मुलींनी निर्भय कन्या अभियान मध्ये सहभाग घेतला आहे त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. प्राचार्य डॉ.शैलजा सांगळे यांनी महिला स्व :संरक्षण याविषयी मुलींना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, मुलींनी कोणत्याही प्रसंगाला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. तसेच आपण एखाद्या रिक्षामध्ये बसल्यास त्या रिक्षाचा नंबर व कधी बसले आहे असे आपल्या घरच्यांना सांगणे आवश्यक आहे. महिला ह्या भावनाप्रधान असतात एखादा व्यक्ती आपली छेडछाड किंवा विनयभंग करित असेल तर लगेच प्रतिकार करणे महत्त्वाचे आहे किंवा पोलीस स्टेशनला कळविणे आवश्यक आहे. 

मुलींनी निर्भय बनले पाहिजे मनात राग आला पाहिजे कारण एखादा आपल्याला त्रास देत असेल तर त्याला तुम्ही प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती आपल्यावर प्रतिकार करत असेल तर त्याला डोक्यावर किंवा गुडघ्यावर मारणे, सेफ्टी पिन टोचवणे, कंगवा गाला वर टोचवणे किंवा प्रतिकार करणाऱ्या माणसाच्या गळ्याला ओढणी बांधणे किंवा तुमच्याकडे एक शिट्टी असणे आवश्यक आहे. त्या शिट्टी मुळे शेजारील लोक आपल्याला मदत करायला येतील. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलींनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मुलींना निर्भर राहण्यासाठी प्राचार्य डॉ. शैलजा सांगळे यांनी मुलींना निर्भय राहण्यासाठी शपथ दिली. 

दरम्यान श्री. शुभम भालेराव व त्यांच्या सर्व टीमने मुलींना कराटे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दाखविले व मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, डॉ.चंदा हासे, डॉ. विद्या पठारे, महाविद्यालयातील प्रा. प्रीती जोशी, डॉ.जितेंद्र वडसिंगकर, प्रा. अपर्णा पांडे, डॉ.राजेंद्र सरोदे, डॉ. प्रवीण चोळके, डॉ.क्रांती बोरावके, प्रा. प्रीती जोशी, प्रा.महेश खरात, प्रा.गणेश कटारिया , प्रा. शैलेश सुरवसे, प्रा.अरबाज सय्यद , प्रशासकीय सेवक प्रणित पावले व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन डॉ. रमाकांत कसपटे यांनी केले तसेच आभार डॉ. शितल शेकाडे यांनी मानले.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा