Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

आवाज लेखणीचा” साहित्य संमेलन उत्साहात; प्रा. दिलीप वाघमारे यांना ‘आदर्श प्राध्यापक’ पुरस्कार


| सांगावा न्यूज | नाशिक दि. २२ फेब्रुवारी : बी.एस.एफ. बहुउद्देशीय संस्था, संत कबीर बहुउद्देशीय संस्था तसेच उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आवाज लेखणीचा” दुसरे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या प्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. दिलीप भीमराव वाघमारे यांना “आदर्श प्राध्यापक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक कृष्णा मुदगूल होते. विशेष उपस्थिती म्हणून साहित्यिक सतीश शिंदे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सोनवणे तसेच साहित्यिक वैशाली सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली.
संमेलनात सहभागी कवींनी समाजातील वास्तव, संवेदना आणि विचारप्रवर्तक आशय मांडणाऱ्या कविता सादर केल्या. उपस्थित साहित्यप्रेमींनी काव्यवाचनास उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. वाघमारे यांनी आयोजक संस्थांचे व सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. “माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व संबंधितांचा ऋणी आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भूषण नि. सरदार व कु. अश्विनी बा. सांगळे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित राहून संमेलन यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, कवी व साहित्यप्रेमींचे आभार मानले. साहित्य चळवळीला बळ देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा