Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

सलगरा बु येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी



| सांगावा न्यूज | सलगरा बु, दिनांक १६ एप्रिल २०२६ : विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल रोजी सलगरा बु येथे साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच शांताबाई साळुंके व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सलगरा बु. गावातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब कांबळे म्हणाले की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्षाच्या करा या विचार तंत्रामुळे समाजात परिवर्तन घडले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता आचरणात आणणे ही काळाची गरज आहे"

दरम्यान सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पमाला व पुष्प अर्पण करून सामूहिक वंदना घेण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. यावेळी सलगरा बु गावचे सरपंच शांताबाई साळुंके, स्वरूप साळुंखे, गोवर्धन महाळ, जयंती उत्सव समिती अध्यक्ष भैय्यासाहेब कांबळे, उपाध्यक्ष रणजीत मदाळे, सचिव विजय गायकवाड, खजिनदार बुद्धभुषण कांबळे,सदस्य सिद्धार्थ कांबळे, सदस्य जयदीप कांबळे, राजाभाऊ कांबळे, समाधान भोळे, रत्नदिप कांबळे, परमेश्वर क्षीरसागर, क्षितिज कांबळे, अमोल गायकवाड, विशाल गायकवाड, अशोक शंकरराव कांबळे, अशोक राजाराम कांबळे, धम्मपाल कांबळे, मधुकर कांबळे, देविदास कांबळे व सर्व बौद्ध बांधवा भीम आयुयायी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा