Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ३१ मे, २०२६

छावा मराठा सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३१ मे २०२६ :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी मोरवाडी चौक येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे, छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव सचिन भाऊ भिसे0प्रदेश कार्याध्यक्ष विलास दादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ( धनगर नेते पिंपरी चिंचवड ) रामभाऊ सूर्यवंशी, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ धस, जिल्हाध्यक्ष सनी भाऊ निकाळजे, पंडित घोडके, प्रकाश म्हेत्रे, सचिन गोवाडे, भीम दूधभाते, दगडू मरळे, बबन गोबाडे, विठ्ठल गुंजुटे, गणेश घोडके, महादेव रोडे, चंद्रकांत हराळे, सूर्यभान सूर्यवंशी, सोमनाथ कलशेट्टी, नितीन जाधव, अशोक दूधभाते यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधव व छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या स्त्रीशक्ती, न्याय, दूरदृष्टी आणि लोककल्याण यांचे जिवंत प्रतीक होत्या. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण अशा महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करतो ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले.

अठराव्या शतकात समाजात स्त्रियांना फारसे स्वातंत्र्य नव्हते. अशा काळात अहिल्याबाईंनी केवळ राज्यकारभार सांभाळला नाही, तर आदर्श प्रशासन कसे असावे याचे उदाहरण घालून दिले. पती आणि पुत्राच्या निधनानंतरही त्यांनी दुःखाला शरण न जाता संपूर्ण प्रजेच्या हितासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांचे जीवन हे संकटांवर मात करून यशस्वी होण्याची प्रेरणा देणारे आहे. अहिल्याबाईंनी न्यायदानात कोणताही भेदभाव केला नाही. गरीब, शेतकरी, महिला आणि दुर्बल घटकांच्या समस्या त्यांनी संवेदनशीलतेने सोडवल्या. त्यांच्या कारकिर्दीत प्रजेला सुरक्षितता, न्याय आणि विकासाची हमी मिळाली. त्यामुळे त्यांना "लोकमाता" म्हणून सन्मानाने ओळखले जाते. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि सार्वजनिक बांधकामे उभारली. काशी विश्वनाथ मंदिर सोमनाथ मंदिर यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन केवळ एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी होता. आजच्या महिलांसाठी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. 

त्यांनी सिद्ध केले की स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाज आणि राष्ट्र घडविण्याचीही ताकद तिच्यात आहे. आत्मविश्वास, कर्तृत्व, संयम आणि नेतृत्व या गुणांच्या जोरावर स्त्री कोणतेही शिखर गाठू शकते. अहिल्याबाई होळकर यांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात समानता, न्याय आणि मानवतेची मूल्ये रुजविण्याचा संकल्प आपण करूया. "स्त्री ही अबला नसून सबला आहे, याचा इतिहासातील सर्वोत्तम पुरावा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर." उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले.


-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा