Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १७ मे, २०२६

आमदार महेश लांडगे यांना माजी महापौर मंगला कदम यांनी भर रस्त्यात जाब विचारला; कदम यांच्या तीव्र संवादाने काही वेळ रस्तावर तणावाचे वातावरण!


मंगला कदम आणि महेश लांडगे यांच्यामध्ये भर रस्त्यावर शाब्दिक चकमक; निलेश नेवाळे आणि मंगला कदम यांच्यामध्ये शाब्दिक राडा 

काशिनाथ नखाते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा नंतर लगेच गेट बाहेर रस्त्यावर लोकप्रतिनिधींमध्ये 
तुफान गोंधळ

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १७ मे २०२६ : 
संभाजीनगर येथील समाज मंदिरावरून माजी महापौर मंगलाताई कदम यांनी काशिनाथ नखाते यांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असलेले आमदार महेश लांडगे यांना तीव्र शब्दात खडा संवाद करून जाब विचारला. आज दिनांक १७ मे रोजी काशीनाथ नखाते आयोजित कामगार मेळाव्यात महेश लांडगे आणि स्थानिक नगरसेवक आले होते. कार्यक्रम संपल्या नंतर बाहेर रस्त्यावर नगरसेवक निलेश नेवाळे आणि माजी महापौर मंगला कदम यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यांच्यामध्ये झालेला विसंवाद विकोपाला जाण्याच्या मार्गावर असताना कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून नेवाळे तेथून काढता पाय घेवून निघून गेले. दरम्यान आमदार महेश लांडगे यांना रस्त्यात थांबवून तीव्र भावना व्यक्त करीत "दादा तुमच्यामुळे आम्ही विलास लांडे यांना पाडले आणि तुम्हाला निवडून दिले" असा उंच आवाजात खडा संवाद करून मंगला कदम यांनी दादांना सुनावले. तुमचे पत्र असताना देखील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेवक मी हाती घेतलेल्या कार्यात अडथळा आणून त्रास देण्याचे काम करीत असल्याची भावना यावेळी कदम यांनी आमदार लांडगे यांना बोलून दखवली. हा संपूर्ण राडा सदृश्य प्रकार अजिंठानगर संभाजीनगर सीमेवरील साई गार्डन येथील रस्त्यावर झाला.

याबद्दल घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, हातगाडी पथारी पथस्थळी भाजी विक्रेते या असंघटित छोटे व्यापारी व कामगारांचे नेते काशीनाथ नखाते यांनी कामगार मेळावा आयोजित करून यामध्ये कामगारांचा श्रम प्रतिष्ठा पुरस्कार व विविध सन्मान तसेच विद्यार्थी स्कॉलरशिप वाटप समारंभ आयोजित केला होता. 
सदर पुरस्कार वितरण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वितरित होत होता. दरम्यान कार्यक्रम आटोपून साई गार्डनच्या बाहेर आमदार साहेब निघत असताना मंगलाताई कदम यांनी कार्यक्रमाच्या गेट समोर कार्यकर्त्यांसह येऊन आमदार महेश लांडगे यांना थांबवले. आणि अत्यंत तीव्र शब्दांत वरच्या आवाजात आमदारांच्या कडे बोट दाखवून आपला आक्रोश माजी महापौर मंगला कदम यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाग क्रमांक ११ मधील चारही नगरसेवकांच्या विरोधात आणि भाजपाच्या विरोधात शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवक निलेश नेवाळे आणि मंगला कदम यांच्यात जोरदार शाब्दिक राडा झाला झाला. आमदार महेश लांडगे यांचे पत्र असूनही हे प्रभागातील नगरसेवक सबंधित कामात ढवळाढवळ करत आहेत, काम नीट होऊ देत नाहीत, असा थेट आरोप करून आमदार महेश लांडगे यांच्याशी टोकाचा संवाद करून मंगलाताई कदम यांनी तीव्र भावना प्रकट केल्या. यावेळी दोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर असा विसंवाद करून राडा करीत असतांना निदर्शनास येताच काही माध्यमांनी हा राडा चित्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु माध्यमातील प्रतिनिधींना आमदार महेश लांडगे आणि मंगल कदम यांनी व्हिडिओ काढण्यास मज्जाव करून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व लोप्रतिनिधींनी स्वतः रस्त्यावर राडा घालून पत्रकारांना व्हिडिओ वार्तांकन करण्यास मनाई करून पत्रकारांच्या कार्यात अडथळा निर्माण केल्याच्या भावना उपस्थित मध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. तरीही मध्यम प्रतिनिधी चित्रीकरण करीत आहेत असे निदर्शनास येताच सर्व लोकप्रतिनिधींनी तेथून लवकर निघून जाणे पसंत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा