शैक्षणिक व कौशल्य असलेल्या तरुण तरुणींच्या स्वप्नांना रोजगाराची साथ
| सांगावा न्यूज | सांगवी, दिनांक १४ मे २०२६ : नामांकित कंपन्यांच्या सहभागातून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा भव्य रोजगार मेळावा हा उपक्रम शिक्षित आणि कौशल्य धारक तरुण तरुणीसाठी तसेच गरजवंताच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी येथे संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तसेच विविध प्रशासकीय कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या रोजगार मिळेव्यातून संधी उपलब्ध करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्या या नावाने आयोजित उपक्रमास तरुण तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात तब्बल १२० कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून १५४७८ युवक-युवतींनी नोंदणी केली. दरवर्षी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असून, या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार, कौशल्य विकास आणि करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
"जिल्हा ‘जीसीसी’च्या माध्यमातून जागतिक ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित होत असल्याचे सांगितले. पुण्याच्या विस्तारित विकासासाठी ६,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून एआय, आयटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे आता जागतिक ‘एज्युकेशन आणि टेक हब’ म्हणून पुढे येत आहे, असे मत व्यक्त केले. यासोबतच, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कौशल्याधारित भारत’ या दृष्टीकोनातून प्रेरणा मिळत असून, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगार व उद्योगवाढीला गती मिळत आहे"
___ शंकर जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा)
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग उपायुक्त सौ.अनुपमा पवार, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. सु. रा. वराडे, पिंपरी चिंचवड महापालिका पक्षनेते श्री. प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. अभिषेक बारणे, माजी महापौर सौ.माई ढोरे, माजी पक्ष नेते श्री. नामदेव ढाके, विद्यमान महिला बालकल्याण सभापती सौ.रवीना अंगोळकर, शहर सुधारणा समिती सभापती श्री. संजय (नाना) काटे, कला क्रीडा समितीचे सभापती श्री. कैलास कुटे, माजी महापौर तसेच विद्यमान नगरसेविका सौ.शकुंतला धराडे, नगरसेविका श्रीमती आरती चोंधे, सौ.अर्चना तापकीर, सौ.कुंदा भिसे, सौ.नीता पाडाळे, सौ.स्नेहा कलाटे, सौ. रेश्मा भुजबळ, सौ.पल्लवी जगताप, सौ. तृप्ती कांबळे, सौ.पल्लवी वाल्हेकर, सौ.सविता खुळे, माजी नगरसेविका सौ. उषा मुंढे, सौ.निर्मला कुटे, नगरसेवक श्री. कुणाल वाव्हळकर, श्री. सुरेश भोईर, श्री. बाबा त्रिभुवन, श्री. संदीप कस्पटे, श्री. विनोद नढे, श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, श्री. शशिकांत कदम, श्री. शाम जगताप, संयोजक श्री. मनोजकुमार मारकड, श्री. भारत मदने तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा