पीएमश्री माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद!महानगरपालिकेच्या शैक्षणिक स्कॉलर साठी आर्थिक रक्कम बक्षिसास २५ विद्यार्थी विद्यार्थिनी पात्र
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक १४ मे २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींची गुणवत्ता वाढवी म्हणून महापालिका शाळेतील इयत्ता दहावीतील सर्वोत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त स्कॉलर विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्थिक रक्कम बक्षिसांची योजना राबवली जात आहे. यंदा सन २०२६ मध्ये पीएमश्री माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी कौतुकास्पद यश संपादन करुन एकूण २५ विद्यार्थी विद्यार्थिनी या योजनेस पात्र ठरले आहेत. यामध्ये ९०% च्या पुढे गुण मिळवून यश संपादन केलेले ३ विद्यार्थी विद्यार्थीनी असून यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षिस मिळणार आहे. यामध्ये श्वेता अचमलवाड (९३.४०%), घोगरे आविष्कार (९३.२०%), गंधले आरती (९१.८०%) हे तिघे लाखाचे मानकरी ठरले आहेत. यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मार्क्स मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ८५% च्या पुढे गुण मिळवून यश संपादन करणारे नऊ विद्यार्थी विद्यार्थीनी असून यांना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस मिळणार आहे तर ८०% च्या पुढे गुण मिळवून तेरा विद्यार्थी विद्यार्थीनी बक्षीस मिळविण्यास पात्र ठरले असून यांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षिस मिळणार आहे. तसेच उर्दू माध्यमातून आयेशा नदाफ हिने ८५.४०% गुण मिळवून पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळविण्यास पात्रता सिद्ध केली आहे. थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीएमश्री माध्यमिक विद्यालयाने दहावीतील बोर्ड परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून बक्षिसास पात्र राहण्याची कामगिरी सातत्याने केल्याबद्दल पालकवर्ग, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून शाळा, विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले जात असून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. या अगोदरही दरवर्षी पीएमश्री माध्यमिक विद्यालय थेरगाव च्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा अशी कामगिरी केली आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेने आतापर्यंत उत्तम निकाल दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शैक्षणिक प्रोत्साहनपर दहावीतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आर्थिक बक्षिस पात्र योजनेत घवघवीत यश आपल्या शाळेने मिळविल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पर्यवेक्षक व शिक्षकांचे मनस्वी अभिनंदन करून मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पीएमश्री माध्यमिक विद्यालय थेरगाव च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वोत्तम गुण मिळवून संपादन केलेले यश हे केवळ पिंपरी चिंचवड पुरते मर्यादित नसून, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नवलौकित मिळवला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनपर भरघोस बक्षिसे देणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकमेव असून यामध्ये शाब्बासकीस आणि बक्षिसास पात्र ठरण्याची सातत्यपूर्ण कामगिरी पीएमश्री माध्यमिक विद्यालय थेरगाव करीत आहे.
या गुणवंत व लाखांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षक श्रीम. मंजुषा टिकेकर, हर्षदा राऊत, नामदेव कोकणे, श्रीम. रुपाली गाथा, श्री उदयकुमार बनसोडे, श्रीम. मंगल आव्हाड, श्री इस्माईल मुल्ला, मोहन भोये, श्री तायडे, श्रीम. रेश्मा जगताप, श्रीम वैशाली गाढे, श्रीम. स्नेहल भोसले, संदीप कल्याणकर, योजना भागवत, श्रीम. पाटील, नसीमा चितकुटे, श्रीम. गोरक्ष, श्री शेंडगे, श्री सुतार, श्रीम. सोनाली जाधव, श्री विद्यानंद सावंत, श्री भास्कर साळवे, श्रीम. माधुरी सायखेडे, श्रीम. तुपे, श्री बालाजी जगताप, श्रीम कळंबे, श्री मुंडे, श्री मोरे, श्रीम. नेहा जाधव, श्री महेश पवार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. आपल्या पाल्याला गुणवंत घडविण्यामध्ये पालकांचाही मोठा सहभाग असल्याची भावना मुख्याध्यापक श्री बाबासाहेब राठोड यांनी माध्यमांना माहिती देताना बोलून दाखवली.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा