| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक २२ : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात पिंपळे निलख ते हिंजवडी बायपास रोडलगत उभारण्यात येत असलेल्या नवीन पेट्रोल पंपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित पेट्रोल पंप मालकाने या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या असून सदर जागा एन ए (नॉन अॅग्रिकल्चर) प्लॉट असल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी या दाव्याला तीव्र विरोध करत संबंधित पेट्रोल पंप नदीपात्राच्या ब्ल्यू लाईन अर्थात निळ्या पूररेषेच्या आतच येत असल्याचा आरोप केला आहे. वाकड परिसर झपाट्याने विकसित होत असताना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. अशातच पिंपळे निलख ते हिंजवडी बायपास रोडवरील या नव्या पेट्रोल पंपाचे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तक्रार करून आक्षेप नोंदवला होता.
दरम्यान, पेट्रोल पंप मालकाने सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या घेतल्याचा दावा केला आहे. “सदर जागा कायदेशीररित्या एन ए करण्यात आलेली आहे. तसेच विविध विभागांची मंजुरी घेतल्यानंतरच काम सुरू करण्यात आले आहे. नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले असून काही लोकांकडून विनाकारण गैरसमज पसरवले जात आहेत,” असे पंप मालकाच्या वतीने सांगण्यात आले.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________
.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा