Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २४ मे, २०२६

सतीश काळे यांना 'जेतवन समाजभूषण' पुरस्कार प्रदान


सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड : जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्ट थेरगाव वाकड यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘जेतवन समाजभूषण पुरस्कार २०२६’ यावर्षीचे मानकरी सतीश काळे यांना जाहीर करून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत व्यावसायिक यश मिळवणे आणि समाजातील वंचित,पीडित घटकांसाठी अविरत संघर्ष करणे, या त्यांच्या अद्वितीय कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. प्रतिकूलतेतून यशाचे शिखर एक प्रेरणादायी प्रवास धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील 'तांदूळवाडी' या अत्यंत दुर्गम व मागासलेल्या भागात जन्मलेल्या सतीश काळे यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. घरची बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही. शेतमजूर, हॉटेलमध्ये वेटर आणि दुकानात मदतनीस (हेल्पर) म्हणून काम करत त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला. 

त्यांचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आणि प्रचंड प्रेरणा देणारा ठरला आहे. सामाजिक बांधिलकी आणि लढा व्यवसायात स्थिरावल्यानंतरही काळे यांनी आपली नाळ समाजाशी कायम ठेवली. २००७ मध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांशी जोडून घेत त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. अंधश्रद्धा व अनिष्ट रूढींना विरोध,समाजातील अंधश्रद्धा, वाईट रूढी-परंपरा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच प्रखर आवाज उठवला. बीडी बंडल वरून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा हटवून संभाजी महाराजांच्या नावाने विक्री होत असलेल्या बीडी बंडलचे नाव बदलण्यास कंपनीस भाग पाडले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात लावण्यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला.पीडितांना न्याय: पत्रकारांवरील हल्ले असोत की मराठा आरक्षणाचे आंदोलन, त्यांनी प्रत्येक जनआंदोलनात हिररीने भाग घेतला. वैद्यकीय क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या अक्षम व पीडित नागरिकांचे वैद्यकीय बिल माफ करून देण्यात ते मोठे योगदान देत आहेत.घरापासून समाज परिवर्तनाची सुरुवात आपल्या कुटुंबातील मुलाचा व मुलीचा तसेच पुतण्याच्या आदर्श 'शिवविवाह' सोहळे अनिष्ट रुढी परंपरेला छेद देत आयोजित करून त्यांनी समाज परिवर्तनाचा आदर्श स्वतःच्या घरापासून घालून दिला. सतीश काळे यांच्या या तेजस्वी आणि धडाडीच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टला सार्थ अभिमान वाटत असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वि जी सुर्यवंशी, उपाध्यक्ष विजय खरात आणि सचिव शाम सोनवणे यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण परिसरातून सतीश काळे यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)
संपादक, सांगावा न्यूज
___________________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा