सांगावा, दि. २४ : विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर बुधवार दिनांक २५/०९/२०२४ रोजी सकाळी अकरा वाजता जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती आरपीआय पक्षाचे थेरगाव विभाग अध्यक्ष विकास भाऊ गाडे यांनी दिली.
सदरील मोर्चाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल भाऊ व्हावळकर हे करणार आहेत. या मोर्चामध्ये प्रामुख्याने पिंपरी येथे माता रमाई स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे , एस आर ए योजनेतील प्रत्येक झोपडपट्टी धारखांना पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्यात यावे, शहरातील नदी काठावर सीमा भिंत बांधावी, महानगरपालिकेत मागासवर्गीयाच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, नोकर भरती पुर्ण करावी, महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी व डॉक्टर भरती बंद करून ती कायमस्वरूपी भरती करावी, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यात यावा, रेल्वे हद्दीतील रहिवाशांना पक्के घरी बांधून देण्यात यावे, ड्रेनेज लाईन तुंबू नये म्हणून त्या नव्याने टाकण्यात यावे अशा विविध लोकांच्या प्रलंबित मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा आर पी आय पक्षाच्या वतीने महापालिकेवर धडकणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा