सांगावा, पोलादपूर. दि. २४ : रयत शिक्षण संस्था इंग्लिश मिडीयम पोलादपूर हि शाळा दाखला देत नसून नियमबाह्य शैक्षणिक फी १२००० रक्कमेची मागणी करून दाखला देत नसल्याने मुलीला शैक्षणिक वर्षात अद्याप प्रवेश मिळालेला नाही. हि तक्रार घेऊन श्री व सौ जाधव हे पालक पोलादपूर मनसे जनसंपर्क कार्यालयात आल्यानंतर पुढे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकारी यांनी संबंधित शाळेत जाऊन शाळेला दाखला देण्याची विनंती करूनही मुजोर शाळेने दाखला देण्यास टाळाटाळ केली . त्यामुळे पोलादपूर शिक्षण विभागात येऊन संबधित अधिकारी यांना या विषयात लक्ष देऊन दाखला मिळवून देण्याची विनंती केली. यावर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने निम्मे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले असल्याने व पुढील प्रवेशासाठी दाखला आवश्यक असल्याने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचायत समिती कार्यालयातच ठिय्या देण्यात आला. दाखला मिळाल्याशिवाय उठणार नाही. संबंधित शाळेवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी हि भूमिका मनविसे कडून घेण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली आणि नियमबाह्य शैक्षणिक फी १२००० रुपयेसाठी अडवणूक केलेला दाखला विद्यार्थिनीला कोणतीही रक्कम न भरता निःशुल्क मिळाला.
यावेळी विद्यार्थिनीच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब , मनविसे अध्यक्ष अमितसाहेब व मनसे मनविसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांचे आभार मानले. पोलादपूर मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या आंदोलनात मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, मनसे शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे, तुषार पवार, मनविसे तालुका सचिव ओंकार उतेकर, मनविसे शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, मनविसे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, अखिलेश शिंदे, विशाल पवार, आदित्य गायकवाड, निखिल उतेकर, आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा