लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जन आक्रोश मोर्चामध्ये हजारो लोकांचा सहभाग
विविध मागण्यांसाठी केलेल्या मोर्चाला महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादसांगावा, पिंपरी चिंचवड, दि. २६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विविध मागण्यासाठी आर पी आय चे शहराध्यक्ष मा श्री कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा पार पडला. यामध्ये हजारो लोकांनी उत्स्पूर्त सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड शहरातील लोकांच्या सोईसाठी विविध मागण्या हे या जन आक्रोश मोर्चाचा विषय होता . यामध्ये प्रामुख्याने आर पी आय पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता ताई सोनकांबळे व प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांची प्रमुख उपस्थित होती.
जन आक्रोश मोर्चा मध्ये ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या पुढीलप्रमाणे
१) माता रमाई स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे
२) पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जे रहिवाशी बांधकाम इमारतींचे प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पांतर्गत प्रत्येक झोपडीधारकांना ५०० स्क्वेअर फुट घर मिळाले पाहिजे.
०३) पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नदीकिनारी सीमा भिंत बांधणे ज्यामुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही व त्यांचा संसार उध्वस्त होणार नाही
०४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या सर्व जागा भरल्या पाहिजेत व नोकर भरती पूर्ण केले पाहिजे.
०५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी डॉक्टर भरण्याची पद्धत बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी कर्मचारी डॉक्टर भरले पाहिजेत
०६) पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे
०७) पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रेल्वे यादीतील लोकांना त्याच गावात दुसरी घरे बांधून देण्यात यावीत.
०८) पिंपरी चिंचवड शहरातील अनेक वस्तीमध्ये काही ठिकाणी सांडपाणी व मैला वाहक चेंबर मधून दुर्गंधीयुक्त पाणी घरात येते त्यामुळे याकडे वेळोवेळी सातत्याने लक्ष देवून वेळच्या वेळी चेंबर दुरुस्त करावे.
०९) मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ३००० कंत्राटी कामगारांना समान वेतन या कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.
१०) पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण बाधित घरे दंड आकारणी नियमित करावे.
११) शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे ऑडिट करण्यात यावे.
१२) महानगरपालिकेने कब्रस्तानासाठी दिलेले जागा लवकरात लवकर हस्तांतरित करण्यात यावी.
१३) टपरी हातगाडी पथारीवाले यांच्या संरक्षणामध्ये पात्र झालेल्या हातगाडी टपरीधारकांना त्वरित परवाने वितरित करण्यात यावेत आणि पात्र हातगाडी धारकावर कार्यवाही करू नये.
१४) महापालिकेने ओपन आरडीने राबवलेल्या पिंपरी चिंचवड मधील सर्व गृह प्रकल्पाला ज्यांची सदनिका ५०० स्क्वेअर फुटांच्या आहेत अशा सर्व सदनिका धारकांचा मालमत्ता कर माफ झाला पाहिजे.
१५) दरवर्षी पावसाळ्यामध्येच स्पाईन रोड चिखली घरकुल येथील पावसामुळे बाहेरून येणारे पाणी इमारतीमध्ये शिरते , इमारतीची लिफ्ट पिण्याच्या टाक्या पूर्णपणे पाण्यात असतात , गेले दहा वर्षापासून असाच प्रकार होतो, म्हणून यावर कायम स्वरुपी उपाय योजना करून येथील नागरिकांची या समस्येतून सुटका करावी
१६) स्पाईन रोड चिखली घरकुल येथील बुद्ध समाजाला धार्मिक विधी करण्यासाठी समाज मंदिर व पाच गुंठे मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
अशा विविध मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्त क्रमांक ०१ चे मा.जांभळे पाटील साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून ५०० स्केअर फुट घर मिळावे , यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठपुरावासाठी पाठवला जाईल आणि इतर मागण्यासाठी सकारात्मक विचार करून व प्रत्यक्ष पाहणी करून येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाहीला सुरवात करू अशी लेखी हमी दिली.
पिंपरी चिंचवड आयुक्त मा.शेखर सिंह साहेब यांचेसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शिस्टमंडळासोबत पुढील दोन दिवसांमध्ये मीटिंग लावून इतर प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सुद्धा लेखी आश्वासन दिले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे नेते सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, सुरेश निकाळजे, कामगार नेते विनोद चांदमारे,शहर सरचिटणीस दयानंद वाघमारे, शहर कार्याध्यक्ष राजू उबाळे, शहर उपाध्यक्ष योगेश भोसले, शहर उपाध्यक्ष रहिम कुरेशी, जेस्ट उपाध्यक्ष नवनाथ डांगे, संजय गायकवाड ,सुनील वाघमारे ,राजेंद्र कांबळे, सुरेश आठवले ,राघू साबळे, संभाजी वाघमारे ,अतुल जाधव ,संघटक मोहन मस्के, संदीप तोरणे ,सहकार्यअध्यक्ष भारत भगत, शेखलाल नदाफ ,खजिनदार गौतम गायकवाड ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष नितीन पटेकर,चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष बाळासाहेब कोकाटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दादा शिरोळे,भोसरी विधानसभा अध्यक्ष संजय सरोदे,उपाध्यक्ष शरद फडतरे ,संघटक राघू बनसोडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष विलास गरड,उपकार्याध्यक्ष दगडू क्षीरसागर, उपाध्यक्ष साहेबराव ससाने, गौतम जकाते ,संघटक सचिव अक्षय धुनघव ,शेषराव सूर्यवंशी, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष सत्यवान कोल्हे ,महिला आघाडीचे नेत्या रत्नमाला ताई सावंत,ज्योती कांबळे,कविता कांबळे, प्रभाग क्रमांक २३ अध्यक्ष विकास गाडे, प्रभाग क्रमांक २५ अध्यक्ष किरण जाधव,प्रभाग क्रमांक २९ अध्यक्ष आनंद गायकवाड , प्रभाग क्रमांक २७ अध्यक्ष राजेश बोबडे , अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष शादाब पठाण कामगार ,आघाडीचे अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे ,आनंदनगर महिला अध्यक्ष वाघमारे ताई, मा शेषेराव सुर्यवंशी ,मा मदन नाईक, मा बाळासाहेब आंबुरे ,मा लक्ष्मण मुदळे ,मा रमेश गायकवाड, सुदाम कांबळे, मा नारायण वानखेडे, मा आत्माराम सोनकांबळे, मा बलभीम सोनकांबळे,मा पंढरी खिल्लारे, मा सचिन जाधव ,महिला पदाधिकारी श्रीमती ध्रुपती सोनवणे , प्रभाग क्रमांक २३ महिला अध्यक्षा सौ.निर्मला ताई कोकाटे, ललिता मंजाळ मावशी, श्री सूर्यकांत गायकवाड, श्री.किशोर सोनवणे,श्री.सनी कांबळे, श्री बबलू पवार, सौ.सोनी बबलू पवार,यांच्या सह मोठ्या संख्येने महिला व कामगार उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा