Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

प्रवीणदादा रणबागुल यांची मतदार संघात परिवर्तन जनसन्मान यात्रा : सोनगिरी - भोनगिरी - वाकवड मध्ये जंगी स्वागत

 विविध समाजाची लोकं एकत्र येवून प्रवीणदादा रणबागुल यांचे स्वागत करीत आहेत


सांगावा, भूम. दि. २८ : भूम - परांडा - वाशी मतदार संघातील लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व श्री प्रवीणदादा रणबागुल यांनी परिवर्तन जनसन्मान यात्रे द्वारे गावो गावी जावून लोकांशी संवाद साधला. आज रोजी सोनगिरी, भोनगिरी, आणि वाकवड याठिकाणी जावून जनतेचा कौल घेतला. दरम्यान तिन्ही गावामध्ये प्रवीणदादा रणबागुल यांचे हलगी वाजवत स्वागत केले. यातून लोकांचा प्रतिसाद आहे असे चित्र उभे राहिले. यंदा भूम - परांडा - वाशी मतदार संघात प्रवीणदादा रणबागुल जबरदस्त झुंज देतील अशी लोकांची भावना आहे.


प्रवीणदादा रणबागुल हे वंचित बहुजन आघाडीचे मतदार संघातील सक्रिय नेते आहेत. पक्षाकडून त्यांना भूम - परांडा - वाशी मतदार संघातून तिकीट मिळेल असे वाटेवर सध्यातरी लोकांच्या चर्चेतून जाणवते आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदर संघात वंचित बहुजन आघाडीकडून श्री सुरेश कांबळे यांना तिकीट दिले होते पण ऐनवेळी काही राजकीय घडामोडी घडल्या आणि वांचीताची चांगली ताकद असताना देखील उमेदवार बॅफूटवर गेले. वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांनी मग ते मागील लोकसभा असो किंवा विधानसभा उमेदवारांनी काही ठिकाणी माघार तर काही ठिकाणी सेटलमेंट केल्याची चर्चा लोकांमध्ये जोर धरून आहे. पण यंदाच्या विधानसभेत मात्र प्रवीणदादा रणबागुल यांनी चांगलीच कंबर कसली असून ते निखराचा लढा देतील अशी भावना जनसामान्य पाहायला मिळते. प्रवीणदादा रणबागुल हे विद्यमान आमदार किंवा माझी आमदाराला धक्का देतील ते समजायला इलेक्शन पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


सध्या तरी श्री प्रवीणदादा रणबागुल यांनी मतदार संघात वातावरण टाईट केलं असून याचाच परिणाम म्हणून आज सोनगिरी , भोनगिरी आणि वाकवड मध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले. मतदारांशी सुसंवाद साधला.


भोरगिरी मध्ये आगमन होताच ग्रामस्थांनी दादाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

सोनगिरी मध्ये देखील प्रविण दादा रणबागुल यांचं ग्रामस्थांनी हलकी ताशा वाजवून स्वागत केलं. फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सन्मान केला . गावाच्या विविध दैवतांचे दर्शन घेतले.

वाकवड मध्ये गावकऱ्यांच्या सोबत संवाद साधून ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी श्री प्रवीणदादा रणबागुल यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री प्रवीणदादा रणबागुल हे फिक्स आमदार होतील अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा