समाजकारणाच्या नावाखाली एस.आर.ए प्रकल्प वेठीस धरणाऱ्या ब्लॅकमेलरच्या संभ्रमास्पद बेछूट विधानावर विश्वास ठेवू नका जितेंद्र ननावरे यांचे नागरिकांना आवाहन
| सांगावा न्यूज | भोसरी, दिनांक , २४ : जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल माजी नगरसेवक जितेंद्र नानावरे यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. माजी नगरसेवक श्री ननावरे यांच्या विरोधात शुभम यादव (रा.महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, पिंपरी चिंचवड) यांनी सदर विषयी फिर्याद दिली. तर, दि.२३ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ननावरे यांना शिवीगाळ केल्यासंबंधी शुभम यादव यांच्यावर सुद्धा माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. माजी लोकप्रतिनिधीला आई बहिणीवर शिवीगाळ आणि मद्यपान करून परिसरात राडेबाजी केल्याबदगालचा आरोप श्री ननावरे यांनी श्री यादव यांच्यावर केला आहे. SRA प्रकल्पाचे नाव पुढे करून केवळ राजकीय द्वेषापोटी आणि माझी बदनामी करण्यासाठी शुभम यादव आणि त्यांचे सहकारी माझ्यावर बिन बुडाचे आरोप करीत असल्याचे श्री जितेंद्र ननावरे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते शुभम यादव यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवड शहरातील आयोजित जनसंवाद सभेत महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याबाबत निवेदन दिले होते, निवेदन दिल्याचा राग मनात धरून माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी भोसरी येथे जीवे मारण्याची धमकी दिल्यासंबंधी यादव यांनी पोलिसात तक्रार दिली.
फुलेनगर येथील एस.आर.ए. प्रकल्पात स्थानिक नगरसेवक, विकासक आणि अधिकारी यांच्या संगणमताने बोगस नोंदी झाल्याचे आरोप यादव यांनी केले. तक्रारदाराला मारहाण व धमकी देणे म्हणजेच लोकशाहीचा गळा दाबण्याची काम ननावरे करत आहेत असे ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की,"सामाजिक काम करत असताना माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्व जितेंद्र ननावरे, विकासक आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील"
शुभम यादव यांच्या आरोपानंतर सांगावा न्यूज ने माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची बाजू समजून घेतली तेव्हा जितेंद्र ननावरे यांनी सुद्धा शुभम यादव यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे असे सांगितले. शुभम यादव यांना दारूचे व्यसन आहे, ते नेहमी नशेत असतात. यादव यांनी जितेंद्र ननावरे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन शिवीगाळ केली , मानहानी होईल अशा शब्दात कुटुंबियांबद्दल अपशब्द वापरले. हे असे कृत्य शुभम यादव सतत माझ्याविरुद्ध करीत असतो. यासंबंधी पोलिसात यादव यांच्याविरुद्ध तक्रार दिली असल्याचे जितेंद्र ननावरे यांनी सांगितले. शिवाय महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने माजी नगरसेवकाला केवळ बदनाम करण्यासाठीच असे कृत्य शुभम यादवला पुढे करून काही त्याचे सहकारी करीत असल्याचे ननावरे यांनी न्यूज प्रतिनिधीला सांगितले.
दि.२२ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली. शुभम यादव यांनी केलेले एस.आर.ए. प्रकल्पा संबंधी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप ननावरे यांनी फेटाळून लावले, ते म्हणाले,"मी दहा वर्ष या परिसरातील नगरसेवक होतो, स्थानिक नागरिकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, सर्व गोरगरीब लोकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ते माझे कर्तव्यच आहे. शुभम यादव आणि त्यांचे सहकारी नेहमीच एस.आर.ए.प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी काढून विनाकारण सामान्य नागरिक, अधिकारी आणि विकासक यांच्या कामात अडचण निर्माण करतात. लोकांना संभ्रमित करून स्वतःचे आर्थिक हित साधत असतात. शुभम यादव आणि त्यांचे सहकारी यांचा एक व्हिडिओ यावेळी ननावरे यांनी पत्रकारांना दाखवला त्यात यादव यांनी ननावरे यांच्या नावाने व त्यांच्या कुटुंबाच्या नावाने अश्लील शिवीगाळ केल्याचे दिसत आहे.
ननावरे पुढे म्हणाले की,"जनसंवाद सभेत तक्रारी करण्याचे सगळ्यांना अधिकार आहेत. यापूर्वी सुद्धा एस.आर.ए प्रकल्पासंबंधी अनेक तक्रारी विविध लोकांनी केल्या, आणि लोकांच्या सूचनेचा आदर करून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्या इतर तक्रारदारांवर कोणालाही मारहाण झाली नाही, धमकी दिली गेली नाही, आणि शुभम यादव ला सुद्धा कधीच धमकी दिलेली नाही. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप हा राजकीय स्टंट असून हे स्वतःचे राजकीय हित साधण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. समाजकारणाच्या नावाखाली सदर टोळी तक्रारी करून ब्लॅकमेलिंग चे धंदे करत असल्याचे थेट आरोप यावेळी ननावरे यांनी यादव यांच्यावर केले. यादव यांनी विकासकाकडून अनेक वेळा ऑनलाईन पैसे उकळल्याचे स्क्रीन शॉट ननवरे यांनी मध्यम प्रतिनिधींना दाखवले.
अशा परिस्थितीत महात्मा फुले नगर येथील नागरिकांनी सदर टोळीवर विश्वास ठेवून संभ्रमित होऊ नका, असे आवाहन माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी नागरिकांना केले. महात्मा फुले नगर मधील रहिवासी आसलेल्या सर्वांना घरे मिळणार आहेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, घरे मिळणे प्रथम प्राधान्य आहे. अशी शाश्वती प्रसार माध्यमातून ननावरे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा