| सांगावा न्यूज | स्वच्छ पिंपरी चिंचवड, सुंदर पिंपरी चिंचवड या ब्रीदवाक्याला जागृती दाखवत दिनांक २६/०९/२०२५ रोजी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका” ग” क्षेत्रिय कार्यालय प्रभाग क्रं. २३ परिसरात घेण्यात आलेल्या पहिल्या उपक्रमासाठी १४० नागरिकांनी सहभाग नोंदवला. थेरगाव हॉस्पिटल समोरील Gvp पॉईंट नष्ट करून स्वच्छ सर्वेक्षण २०२५ (स्वभाव स्वच्छता ,स्वच्छ संस्कार स्वच्छता) स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत अंतर्गत RRR द्वारे सुशोभिकरण करण्यात आले.
यावेळी श्री.किशोर ननवरे (क्षेत्रीय अधिकारी -ग प्रभाग) कु. मनीषा राठोड (स्वच्छता ब्रँड अँबेसिडर) श्री.डॉ.राजेंद्र फिरके (वैद्यकीय अधिकारी) डॉ. मोसलगी (वैद्यकीय अधिकारी) श्री कुंडलिक दरवडे ('ग ' प्रभाग सहाय्यक आरोग्य अधिकारी) श्री शशिकांत मोरे साहेब ('ग' प्रभाग मुख्य आरोग्य निरीक्षक) श्री. उमेश कांबळे (ग क्षेत्रीय कार्यालय मुख्य आरोग्य निरीक्षक) श्री.गोपाल धस, सौ.स्नेहल सुकटे (आरोग्य निरीक्षक) , श्री. सचिन उघडे, श्री.प्रशांत गोटे (आरोग्य सहाय्यक) , श्री दत्तात्रय गायकवाड, श्री नेताजी बारणे , (आरोग्य मुकादम), सचिन वाघिरे शुभम उद्योग, सामाजिक कार्यकर्ते श्री तानाजी बारणे, श्री संतोष बारणे, श्री नरेंद्र माने यांच्यासह वॉर्ड क्रमांक २३ मधील सर्व डिवाइन कर्मचारी, शुभम उद्योग कर्मचारी मनपा कर्मचारी, ह्यूमन मॅट्रिक्स टीम, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
थेरगाव हॉस्पिटल समोरील Gvp पॉईंट या ठिकाणी RRR सुशोभीकरण करून सदर ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले. नागरिक सहभाग लाभला. सर्व नागरिकांना एकत्र करून येथे कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले, शून्य झालेल्या GVP ठिकाणी ग क्षेत्रीय अधिकारी-श्री किशोर ननवरे साहेब यांच्या हस्ते RRRसुशोभीकारणाचे उद्घाटन करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा