Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

Kidzee Pree School चा प्रताप! फी चे इंस्टॉलमेंट थकले म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ठेवले वंचित!

अनधिकृत फी वसुली करून "किडझी पिंपळे गुरव" प्री स्कूल ने पालकांची केली फसवणूक! 

| सांगावा न्यूज | सांगावी,  दिनांक २६ : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील किडझी प्री स्कूलने पालकांची फसवणूक केली असल्याचे स्वतः पालकांनी पुढे येऊन पत्रकारांना माहिती दिली. पालकांकडून भरमसाट फी वसूल केली जाते परंतु त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत. बहुसंख्य पालकांना पावत्या न देता फी रोख रक्कम स्वरुपात स्वीकारली जाते तर काही प्रमाणात ऑनलाईन फी ही शाळा संचालक स्वतः च्या वैयक्तिक अकाऊंट ला घेतात तर काही काही प्रक्रमाणात शाळेच्या अकाउंटला घेतात. त्यामुळे शाळा प्रशासन प्रचंड प्रमाणात सरकारचा कर बुडवण्यासाठी वेगवगेळ्या अनधिकृत कल्पना राबवत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच एखाद्या विद्यार्थ्यांची फी थकली किंवा एक जरी फी चा हप्ता थकला तर थेट विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यापासून मज्जाव केला जातो. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित केले जाते. पालकांनी फी ची भरण्याची वेळ मागितली तरी तशी मुभा न देता शाळा प्रशासन पालकांशी उद्धट आणि उर्मट भाषेत बोलून उलट पालकांनाच धमकावल्याचा प्रकार स्वतः पालकांनी सांगावी पोलिस स्टेशन मध्ये येऊन सांगितला. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नावाखाली देखील भरमसाठ पैसे पालकांकडून घेतले जातात परंतु कार्यक्रमाच्या वेळी मुलांची आणि पालकांची योग्य ती सोय होत नाही. पालकांकडून शाळेने घेतलेले पैसे कोणत्या कोणत्या कार्यासाठी घेतले अशी पालकांनी विचारणा केली असता पालकांना आणि मुलांना धारेवर धरले जाते. पालकांना धमकी दिली जाते. घडलेला प्रकार पिंपळे गुरव येथील किडझी प्री स्कूल येथे पालकांसोबत घडला असून शाळेचे संचालक प्रभाकर साळुंखे आणि संबंधित शाळा प्रशासनाच्या विरोधात लेखी तक्रार गुरवार दिनांक २५ रोजी सांगावी पोलिस ठाण्यात दिली असून शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सरकार लहान मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत असून कुठलेही मूल कुठल्याही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे शासनाचे धोरण आहे. तरीही किझडी सारख्या काही शाळा केवळ पालकांकडून पैसे लुबाडण्याच्या दृष्टीनं शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक फसवणूक तर करीत आहेतच शिवाय एक फी चा हप्ता थकला तरी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून मानसिक सामाजिक शोषण करीत आहेत. एवढंच नव्हे तर किडझी स्कूल चा स्टाफ सुद्धा शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत आहे की नाही अशी शंका पालकांनी व्यक्त केली, कारण किडझी शाळेचा काही स्टाफ हा पालकांशी उर्मट बोलत असून एकजरी फी चा हप्ता थकला तर पालकांना अपमानास्पद वागणूक देतात. शेवटी काही पालकांनी किडझी शाळा प्रशासन, शिक्षक, संस्था चालक यांच्या जाचक आणि अपमानास्पद वर्तनाला कंटाळून आपली मुले या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालक श्री प्रशांत सौ. शामल कांबळे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. गांभीर्याची गोष्ट म्हणजे लहान लहान विद्यार्थ्यां विद्यार्थिनी जेव्हा स्वच्छतागृहामध्ये जातात तेव्हा इथे शाळेतील काही कर्मचारी या लहान विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत आसल्याचे पालकांच्या निदर्शनास आले असल्याचे पालकांनी सांगितले.

याबद्दल शाळा प्रशासनाचे म्हणणे काय आहे, शाळेची बाजू समजावून घेण्यासाठी आमच्या पत्रकाराने फोन केला असता प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांनी न बोलता त्यांनी थेट फोन संचालक प्रभाकर साळुंखे यांच्याकडे दिला तेव्हा प्रभाकर साळुंखे यांनी पत्रकाराला धमकी दिली की तुम्ही पालकांचे ऐकून बातमी दिली तर मी तुमच्यावर डिफर्मेशन ची केस करील ! एकतर पत्रकाराने प्रामाणिकपणे शाळेची बाजू समजावून घेण्यासाठी आणि बातमी एकतर्फी होऊ नये म्हणून फोन केला तर शाळाप्रशासक थेट पत्रकारांनाच धमकी देऊन शाळेची बाजू सांगण्यास टाळाटाळ करतात ! पालकांचे म्हणणे खोटे आहे अस असं फोनवरच सांगून उलट पालकांनाच दोषी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न Kidzee शाळेच्या प्रभाकर पवार यांनी केला असे त्यांच्याशी झालेल्या मोबाईल फोनवरील संभाषणातून जाणवतो.

पालकांनी शाळेच्या चुकीच्या कारभारावर प्रश्न केला तर त्या पालकाच्या मुलांवर डोळा ठेवून जाणून बुजून शाळा प्रशासन संबंधित मुलांना त्रास देतात. संबंधित मुलांच्या शिक्षणाकडे त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. हे जेव्हा काही पालकांच्या निदर्शनास आले याचे पालकांनी शाळा प्रशासनाला तोंडी विनंती करून वर्गातील सीसीटीव्ही फुटेक मागितले , परंतु किझडी शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फूटेज द्यायला विरोध केला तेव्हा खरच ही शाळा विद्यार्थ्यांचा छळ करत असेल असे म्हणायला पालकांना वाव आहे. गांभीर्याची गोष्ट म्हणजे शाळा संचालक व शाळा प्रशासन हे मुलांच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे लक्ष देण्याऐवजी, पालकांच्या गॉसिप्स काय चालतात, कुठल्या पालकाच्या घरात काय चालले आहे, एखादा पालक नियमाने शाळेकडून एखादी माहिती मागवत असेल तर त्यालाच कायद्याची धमकी देऊन त्याचे तोंड कसे बंद करायचे, पालकांनी एकत्र ग्रुप करून मुलांच्या भल्यासाठी एक पालकांचा प्लॅटफॉर्म केला तर सबंधित पालकांना अपमानास्पद वागणूक देणे आणि त्यांच्या पाल्यावर डोळा ठेवून त्रास देणे अशा एक ना अनेक उचापती किडझी पिंपळे गुरव शाळा संचालक आणि काही शिक्षक व इतर स्टाफ करीत असल्याचे काही पालकांनी मध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. तसेच काही पालक उघडपणे बोलत नाहीत पण किडझी स्कूल संचालक, शाळा प्रशासकांविरोधी, शाळा गैर कारभाराबद्दल खाजगीत माहिती देत आहेत, आणि आमचा मुलांना किझडी शाळा प्रशासन धारेवर धरेल म्हणून काही पालक पुढे येऊन उघडपणे बोलत नसले तरी पालकांचे नाव न सांगण्याच्या अटीवर पालकांनी माहिती दिली तर काही पालकांनी शाळा प्रशासनाच्या गैर कारभाराबद्दल कुठलीही भीती न बाळगता उघडपणे माध्यमांच्या कॅमेरा समोर येऊन माहिती दिली. इतर पालक यांनी कॅमेरा समोर बोलण्यास धाडस केले नसले तरी त्यांनी किडझी शाळा व्यवस्थापकाच्या अनधिकृत कृत्याबद्दल लेखी स्वरूपात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.

पालकांनी पुढे येऊन शाळा प्रशासनाचा गैरकारभार मिडिया समोर उघडकीस आणल्यानंतर आणि या किडझी स्कूल पिंपळे गुरव यांच्या संचालक आणि स्टाफ विरुद्ध सांगावी पोलिस स्टेशन येथे स्वतः पालक तक्रार द्यायला आल्यानंतर पत्रकारांनी शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी फोन केला तेव्हा संचालक प्रभाकर साळुंखे यांनी पत्रकारांना धमकी दिली, म्हणाले की तुम्ही जर बातमी दिली तर तुमच्यावर केस करीन? अशा उर्मट भाषेत शाळा प्रशासक पत्रकारांना धमकी देतात. बातमी एकतर्फी होऊ नये म्हणून पत्रकार शाळा संचालाल प्रभाकर साळंखे आणि प्रिन्सिपॉल साळुंखे मॅडम यांना फोन करतात. बातमी बॅलन्स झाली पाहिजे. दोघांचे म्हणणे बातमीत यावे म्हणून प्रामाणिकपणे पत्रकार शाळा प्रशासनाचा कोट घेण्यासाठी फोन करतात तेव्हा उघडपणे संचालक प्रभाकर साळुंखे पत्रकारांना धमकी देतात. अरे वा! ही कसली शाळेची दहशत! ही कसली संचालकांची हुकुमशाही! 
म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तरी पालकांनी बोलायचे नाही, शाळेच्या गैर प्रकाराबद्दल पालकांनी विचारले तर पालकांना अरेरावी करतात! शाळेच्या विरोधात तक्रार द्यायला पालक जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये येतात तेव्हा पत्रकार म्हणून एखादा पत्रकार तुम्हाला तुमची बाजू विचारून घेण्यासाठी फोन करतो तेव्हा त्यालाही धमकी देतात ! नेमकं तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही शाळा संचालक आहात,  का एखादे गुंड, दहशतवादी? ही अशी काय तुमची भाषा ! तुम्ही पालकांना, सामन्य माणसांना, पत्रकारांना धमक्या देता ! नक्की तुम्ही शाळा चालवता की शाळेच्या नावाखाली पालकांकडू पैसे लाटण्याच्या उद्देशाने दहशतवादी संघटना चालवता अस म्हणायची वेळ आणली तुमच्या त्या धमकीयुक्त अर्वाच्य बोलण्याने? हे असे चालणार नाही! तुमच्या धमकीला कुणीही भीक घालणार नाही. आणि पत्रकार तर मुळीच बातमी देण्यावाचून थांबणार नाही. तुमच्या धमकीला घाबरून पत्रकार बातमी देणार नाही असं वाटलं काय तुम्हाला. शाळा प्रशासनाचा निव्वळ बालिशपणा आणि राडेबाजपणा वाटतो! कुणाच्या आशीर्वादाने तुम्ही पालकांना आणि पत्रकारांना धमकी देता. कुणाचे राजकीय वरदहस्त किंवा कुणी गुंड भाई दादागिरी करणारे दहशतवादी टोळी चालवणारे तुमच्या पाठीशी आहेत काय? त्यांची नावे सांगा? कोण तुमच्या पाठीशी आहे. कोण तुम्हाला पाठीशी घालतंय? का स्वतःच तुम्ही गुंडगिरीची भाषा करून दहशत माजवता? तुम्हीच शाळा चालवता की गुंडांची टोळी? तुम्ही गुंडांच्या टोळीचे टोळीप्रमुख आहात काय? पालकांवर, सामान्य माणसांवर आणि पत्रकारांवर दादागिरी करता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. शिक्षणाधिकारी आणि अशा शाळांना परवानगी देणारे संबंधित प्रशासन यांना पालक आणि काही सामाजिक कार्यकर्ते विनंती करताहेत की अशा गैरकारभार करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करुन अशा शाळा तत्काळ बंद केल्या पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर