Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

शिवविवाहात अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थिनीला शिक्षणासाठी ५१ हजारांची मदत

हिंदू लग्न सोहळ्यात मुस्लिम विद्यार्थिनीला मदत करीत जपला सामाजिक सलोखा

हिंदू लग्न सोहळ्यात मुस्लिम विद्यार्थिनीला मदत करीत जपला सामाजिक सलोखा

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक २८ : पिंपरी चिंचवड शहरात नुकताच महाराष्ट्राला आदर्श देणारा एक शिवविवाह सोहळा पार पडला. शिवविवाहाची सुरुवात करण्यापूर्वी संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नकुल भोईर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून कुठल्याही प्रकारचे कर्मकांड विधी न करता संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांचे बंधू उमेश काळे यांचे चिरंजीव रुपेश आणि संजय जाधव यांची कन्या रिया यांचा हा शिवविवाह सोहळा पार पडला. यामध्ये जिजाऊ वंदनेने शिवविवाहाची सुरुवात करण्यात आली. जिजाऊ वंदना तसेच शिवपंचके श्वेता घरत यांनी म्हटले. तसेच शंकर नागणे यांनी लग्न सोहळा विधी पार पाडला. 
लग्नसोहळ्यात होणारा अनास्तव खर्च न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील यास्मिन शेख या इंजिनिअरिंग करू पाहणाऱ्या मुलीला ५१ हजार रुपयाची रोख रक्कम सुपूर्त करण्यात आली. त्यामुळे इंजीनियरिंग ला पुणे येथे प्रवेशास पात्र ठरलेल्या यास्मिन शेख यांच्या प्रवेशातील आर्थिक अडसर दूर होण्यासाठी काळे कुटुंबीयांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून या अनोख्या उपक्रमाचे स्वागत समाज माध्यमातून करण्यात येत आहे. 
यास्मिन शेख या मुलीने कौटुंबिक बिकट स्थितीतही प्रचंड मेहनत, नियोजनपूर्व अभ्यास करीत उत्तुंग असे यश पटकावून इंजीनियरिंग पर्यंत झेप मारली. परंतु प्रवेशापासून शिक्षणाचा खर्च करावा तरी कसा, असा प्रश्‍न यास्मिन व तिच्या पालकांसमोर उभा राहिला असताना समाजमाध्यमातून याबाबतची माहिती समोर आल्यानंतर सतीश काळे यांनी शिक्षणासाठी आपल्या पुतण्याच्या लग्नात समारंभात अनावश्यक खर्च टाळून मदतीचा हात पुढे केला. विशेष बाब म्हणजे एका शिवविवाह सोहळ्यात अशा स्वरूपातील मदत एका गुणवंतास बहाल करीत सामाजिक बांधिलकी दाखवून आदर्श निर्माण केला आहे. या अनोख्या शिवविवाह सोहळ्यानिमित्त राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चासह पुरोगामी चळवळीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर