विद्यार्थ्यांनी नोंदविली वर्तमान समाजातील निरीक्षणे
माजी पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांच्या हस्ते सांगावा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रतिभावंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : प्रिंट आणि डिजिटल मिडियामध्ये समाजातील घडामोडींचे अचूक वार्तांकन करणाऱ्या साप्ताहिक "सांगावा न्यूज" च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी समानार्थी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शुभेछ्यांची केवळ देवान घेवाण करून सांगावा न्यूज चा वर्धापन दिन साजरा न करता समाजातील काही साधक बाधक गोष्टी जाणून घेवून त्यावर सकारात्मक कार्य करण्याच्या उद्देशाने, बालभारती आणि कुमार भारती वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनींची वर्तमान समाजातील काय निरीक्षणे आहेत हे जाणून घेतले. आपला सन्मान स्वीकारल्या नंतर विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने जे काही चुकीचे निदर्शनास येते त्या गोष्टी सर्वांसमोर व्यक्त केल्या. मंगळावर दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५. वा. असा हा स्तुत्य कार्यक्रम घेऊन, "सांगावा" प्रथम वर्धापन दिन थेरगाव, काळेवाडी फाटा येथील सांगावा न्यूज कार्यालयात संपन्न झाला. यावेळी विचार मंचावर माजी पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांच्यासह थेरगावा येथील पीएमश्री विद्यालयाचे मुख्याध्यक बाबासाहेब राठोड, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, सांगावा न्यूज चे संपादक विनय सोनवणे उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थित पत्रकार, विद्यार्थी पालक आणि वाचक दर्शकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
"आम्ही घरून शाळेत जातांना आणि शाळेतून परत घरी येतांना एक गटार सदृश्य उघडा नाला आहे तिथे पाणीपुरचा ठेला लागतो. तिथे लोकं पाणीपुरी खायला जातात. यावेळी गटार सदृश्य नाल्यातून दुर्गंधी येते ते आरोग्यास हानिकारक आहे. तसेच आमच्या कॉलनीत पाण्यासाठी लावलेली मोटार पाण्याची टाकी भरून वाहत असली तरी मोटार तशीच चालू राहते त्यामुळे पाणी आणि वीज वाया जाते"____ प्राची सचिन कावळे (इयत्ता ९ वी)
"कब्बडी खेळत असताना भाजलेल्या मॅट मुळे व्यवस्थित खेळता येत नाही. खेळासाठी महत्वाचे असलेले मॅट व्यवस्थापन भिजणार नाही खराब होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. आमच्या येथील मॅट व्यवस्थित नसेल तर आम्हाला दुसरीकडे खेळासाठी जावे लागते तेही नंतर घरापासून दूर आहे"____ पल्लवी बाळू गायकवाड (इयत्ता ८ वी)
"थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान तसेच नवीन थेरगाव हॉस्पिटल च्या समोरील मुख्य रस्त्यावर ते दिलीप वेंगसरकर स्टेडियन च्या बाजूच्या मुख्य रस्त्यावर लहान आणि मोठ मोठ्या गाड्या पार्किंग केल्या जातात. एवढा मोठा रस्ता असूनही अनधिकृत पार्किंगमुळे छोटा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा व्यवस्थित लाभ घेता येत नाही. शिवाय अपघाताचे प्रमाण वाढत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अशी वाहने सतत पार्किंग केल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना रस्ते साफसफाई करता येत नाहीत. दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या इथे रहिवाशी भागात कचरा संकलन डेपो आहे त्यामुळे खूप दुर्गंधी येते. येथील कचरा संकलन हलवून जिथे लोकवस्ती विरळ आहे किंवा लोकं राहत नाहीत अशा ठिकाणी व्यवस्था करावी" आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी विचारपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सन्मान केल्याबद्दल सांगावा न्यूज टीमचे आभार"____परमवीर खंडू आव्हाड (इयत्ता ९ वी)
विद्यार्थी विद्यार्थिनींची समाजातील निरीक्षणे जाणवून घेऊन त्यासंदर्भात सांगावा न्यूज च्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा करून शासन आणि प्रशासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असे सांगावा न्यूज चे संपादक विनय सोनवणे यांनी सांगितले. तर माजी पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांच्यासह थेरगावा येथील पीएमश्री विद्यालयाचे मुख्याध्यक बाबासाहेब राठोड, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, क्रीडा व सहाय्यक शिक्षिका सोनाली जाधव मॅडम यांनी सांगावा न्यूज च्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या समाजहिताच्या बातम्यांबद्दल टीम "सांगावा" चे कौतुक केले तर सातत्याने दाखवत असलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील बातमीदारीबद्दल प्रोत्साहनपर मनोगते व्यक्त करून साप्ताहिक सांगावा न्यूज च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थी शिक्षक पालकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) चे शहर उपाध्यक्ष अमोल उबाळे, सामाजिक कार्यकर्ते जाफर शेख, पत्रकार आणि डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, सचिव सागर सूर्यवंशी, माजी अध्यक्ष महावीर जाधव, नगरसदस्य ( हातगाडी पथारी टपरी व्यावसायिक पंचायत), जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, अजय लोंढे, श्रीहरी सोनकांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले , रमेश साठे, हरिश्चंद्र देहुगावकर, अशोक कोकणे, शिंगोटे सर, इत्यादी पत्रकार तसेच सिने अभिनेते प्रमोद साखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते DFL च्या दृष्टी जैन, तसेच टीम सांगावा चे संभाजी बारबोले, अमर चाकोटतकर, राहुल जाधव, लिटिल सायन्स चे दत्तात्रय गिरमकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान सांगावा न्यूज च्या वर्धापन दिन विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी DIFT फाउंडेशन चे नरेश गोल्ला सर आणि टीम DFL चे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलुखमैदान प्राध्यापक तुषार डुकरे पाटील यांनी केले तर सांगावा न्यूज चे संपादक विनय सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा