| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १० : ऐतिहासिक शिवप्रताप दिनी ऑटो क्लस्टर सभागृह पिंपरी चिंचवड या ठिकाणी बहुचर्चित अशा उद्योजकांनी उद्योजकांसाठी बनवलेल्या उद्योजक संघटन असलेल्या बहुचर्चित स्वराज्य बिजनेस क्लबचा शुभारंभाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एस फॅमिलीच्या संचालिका सौ. श्वेता मोरे , लाडाची कुल्फी या ब्रँडचे राहुल पापळ,नादब्रह्म इडलीचे कृष्णा निडवंचे, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक राम रैना सर, यांच्यासह स्वराज्य बिजनेस क्लबच्या कोर टीम व रजिस्टर सभासदांसह मंचर लीडरशिप टीम, पुणे लीडरशिप टीम यासह पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील विविध क्षेत्रातील अनेक नवउद्योजक व उद्योजक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व या सोहळ्यात स्वराज्य बिजनेस क्लबची वेबसाईट व लोगो यांचे अनावरण करण्यात आले. व प्रमुख उपस्थित मान्यवर परमेश्वर थिटे, दत्ता कसाळे, निलेश महाजन, तुषार शिंदे, किशोर पाटील, सुवर्णा गोडांबे, अभिजीत घाडगे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर स्वराज्य बिझनेस क्लब ची कार्यपद्धती याविषयी स्वराज्याचे उपाध्यक्ष आणि लाईफ कोच श्री विकास भोईर यांनी माहिती दिली. सर्व अनुभवी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी प्रश्न उत्तरे याच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन केले. स्वराज्य बिजनेस क्लबच्या शुभारंभचा हा दिवस प्रेरणादायी ठरला विविध क्षेत्रात यशस्वी झालेले उद्योजक यावेळी एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांच्या ज्ञानासह अनुभव ऐकण्याची संधी उपलब्ध झाली संवाद, सेवा व प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन यासह ओळखीतून व्यवसाय वाढवणे एकमेकांच्या व्यवसाय वाढीस हातभार लावणे, नेटवर्किंग करणे संवादाच्या माध्यमातून नवीन संधी नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा व प्रोत्साहन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याने उपस्थित सर्वच उद्योजकांनी स्वराज्य बिजनेस क्लब ची सर्व टीम अध्यक्ष डॉ.शिवाजीराव बुचडे पाटील, उपाध्यक्ष विकास भोईर, सचिव किसन गटकळ, खजिनदार स्वाती गोरडे, कार्याध्यक्ष सोमनाथ नाडे, सहकार्याध्यक्ष रमेश साठे यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर व उद्योजक बंधु भगिनींचे धन्यवाद व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा