गायनकलेचे वर्णन करण्यापेक्षा त्याची अनुभूती घेणे हा सर्वोत्तम आनंद ___ डॉ. कुंदाताई भिसे
| सांगावा न्यूज | पिंपळे सौदागर दि. १३ : गायनकला हा एक आनंददायी अनुभव आहे. त्या आनंदाचे शब्दात वर्णन करण्यापेक्षा त्याची अनुभूती घेणे , त्या कलेचा आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ. कुंदाताई भिसे यांनी केले. पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन निर्मित " सिनियर सिटीझन करावके ग्रुप " च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गुरुवार दि. १३ रोजी उन्नती सोशल फाउंडेशनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. कुंदाताई यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, श्रीगणेशाचे आणि साउंड सिस्टीमचे पुजन करण्यात आले. ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार यांनी करावके ग्रुपच्या स्थापने मागील भूमिका प्रास्ताविकातून मांडली.
असोसिएशनमधील ज्येष्ठ कलावंत अशोक येळंमकर, अनिल कुलकर्णी, रविंद्र संधानशिवे, अविनाश इजारदार, शशांक लोकरस, बाळकृष्ण चौधरी, रमेश दुसाने, सुरेखा कुलकर्णी, सुनंदा विधाते, बाबासाहेब काळे, करुणा नवले, विलास फडणीस, विवेकानंद लिगाडे, उषा साळवी, मंगला पाटील , नंदा पवार, यांनी मराठी - हिंदी गाणी सादर केली. दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे रमेश चांडगे, अनिलकुमार शाह, निर्मला कासार, शोभा राजगुरे, रमेश वाणी, सुभाष विधाते, अशोक कलाल उपस्थित होते. " जाने कहॉं गये वो दिन "या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचलन रविंद्र संधानशिवे यांनी केले. अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा