| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ७ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सौ. रेखाताई नरेंद्र माने यांनी रिल्स स्पर्धा आयोजित केली असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा सर्व वयोगटसाठी खुली असून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रिल स्टार साठी ५१,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१,१२१ रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ११,१११ रुपयांची रोख पक्षीसे देऊन Reels Stars चा सन्मान केला जाणार आहे. शिवाय स्पेशल पब्लिक चॉईस पारितोषिक देखील काढले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नसून आपली कला, आत्मविश्वास क्रिएटिव्हिटी दाखवायची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर विषय दिले जातील त्या विषयावर रिल्स बनवायची आहे.
विषय : डान्स, ॲक्टिंग, डायलॉग, देशभक्ती, संस्कृती, मिमिक्री, मोटिवेशनल, सोशल मेसेज, कॉमेडी, एंटरटेनमेंट असे विषय असून स्वतः चे स्वतः रिल्स बनवून सहभागी होता येईल.
स्पर्धेची सुरुवात ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून १० जानेवारी २०२६ पर्यंत स्पर्धा चालू राहील. १४ जानेवारी रोजी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सदर रिल्स स्पर्धा इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या माध्यमांवर प्रदर्शित होईल.
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क : सौ. रेखाताई नरेंद्र माने यांचे जनसंपर्क कार्यालय, लेन नंबर १०, अशोका हौसिंग सोसायटी, थेरगाव.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा