नवीन सुरुवात प्रभागातील विकासाची दिशा बदलणार
| सांगावा न्यूज | काळेवाडी, दिनांक ८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या संपूर्ण परिसरात आणि प्रभागात इच्छुक उमेदवार यांची सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिक कोणाला संधी देणार हे स्पष्ट होत असल्याचे दिसून येईल.
प्रभाग क्रमांक २२ मधून सामाजिक कार्यकर्त्या, जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा सौ.मोनिका नवनाथ नढे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
प्रभागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या दूर केल्या आहेत. प्रभागातील महिलासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना, सामाजिक कार्यक्रम, महिलांसाठी मनोरंजन, खेळ, अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सौ.मोनिका नवनाथ नढे यांनी प्रभागात सामाजिक व धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असतात.त्यांच्या माध्यमातून जयंती उत्सव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, अन्नदान वाटप, महिलांचा सन्मान सोहळा, सण उत्सव, कीर्तन सोहळा, नवरात्र उत्सव आणि अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
प्रभाग क्रमांक २२ मधील विजयनगर, पवना नगर, आदर्श नगर, नढे नगर ,काळेवाडी येथील नागरिकांनी म्हटले की, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी देणार, प्रभागातील सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व करणारा, परिसरातील विकासकामे करणारा, प्रभागातील समस्या सोडवणारा व त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या ताबडतोब सोडवणारा असा नगरसेवक यावेळी प्रभागातून सर्व जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले जात आहे.
सो मोनिका नवनाथ नढे यांच्या माध्यमातून प्रभागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये त्यांना प्रभागातील माय माऊली व जनता मोठा मताधिक्याने मतदान करून प्रभागातील सेवा करण्याचे संधी देणार असल्याचे प्रभागांमध्ये नागरिकांकडून म्हटले जात आहे. माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे यांनी प्रभागातील सामाजिक कार्याच्या माध्यमातून विकास कामे व सामाजिक बांधिलकी जपत लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. लोकांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निवारण केले आहे. प्रभागातील असलेला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी आहे, त्याच जनतेच्या विश्वासाने सौ. मोनिका नवनाथ नढे यांना ही जनता मोठ्या प्रमाणात मतदान करून आशीर्वाद देणार आणि प्रभागातील व परिसरातील सेवा करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले जातेय.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये सौ. मोनिका नवनाथ नढे यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.प्रभागात त्यांचे सामाजिक , आरोग्य,शैक्षणिक व धार्मिक कार्य यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नवनाथ नढे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत असल्याने त्यांचा प्रभागातील व शहरातील राजकीय नेत्याशी जवळीक आहे. ते विरोधी पक्ष नेते नाना काटे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 मध्ये सौ.मोनिका नवनाथ नढे यांना प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा