Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारांनी केला दर्पण दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांची आठवण

 

स्वदेशी अनिष्ट चाली रुढींवर दर्पनकारांनी प्रहार केले ___ विनय सोनवणे (अध्यक्ष: डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड)

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक  ६ जानेवारी २०२६ : आजच्या दिवशी म्हणजे ६ जानेवारी रोजी मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे आज दर्पण दीन म्हणून साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्पण दीन साजरा करण्यात आला. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पत्रकार सागर सूर्यवंशी, विनय सोनवणे, महावीर जाधव, माऊली भोसले, जगन भोसले, सुनंदा निकरड, प्रवीण शिर्के, विश्वजीत पाटील, दिलीप देहाडे, इत्यादी पत्रकार मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महापुरुषांच्या आणि महामातांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले आणि मनोगते व्यक्त केली.

यावेळी बोलतांना, डिजिटल मिडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे म्हणाले की, "बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे द्विभाषिक वृत्तपत्र सुरू केले होते. यामध्ये इंग्रजी आणि मराठी मधून लिखाण केले गेले. इंग्रजी यासाठी की सत्ताधाऱ्यांना इथली दांभिकता, सामाजिक विषमता, आणि अनिष्ट चाली रूढी परंपरा यांची तुलना पाश्चात्य प्रगत राष्ट्रांशी करून स्वदेश कसा परिवर्तित करता येईल यासाठी तर मराठी यासाठी की आपल्या येथील लोकांना आपल्या समस्या कळाव्यात, आपण जगाच्या पाठीवर कुठे आहोत याची जाणीव व्हावी या उद्देशाने दर्पण च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी प्रखाडपणे लिखाण केले. स्वदेशी अनिष्ट चाली रुढींवर दर्पनकारांनी प्रहार केले. आज दर्पण दिनानिमित्त दर्पणकारांच्या लेखणीची आठवण करून नवीन वर्षात ऊर्जा घेवून पत्रकारांना मार्गक्रमण करतांना आज दर्पण दिनानामित्त प्रेरणा मिळत राहील"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा