Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

३२ प्रभागांमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावासहीत चिन्ह चिन्हांची पूर्ण यादी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ३२ प्रभागांमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय नावे आणि चिन्ह 

|सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक ३ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोण उतरले आहे आणि कोण कुणी टक्कर देणार आहे ते आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर अर्जांच्या छावण्या झाल्या त्यात काही उमेदवार अपात्र ठरले होते तर काही पात्र. पात्र उमेदवारांमधून काहींनी माघार घेतली आणि आज पात्र उमेदवारांमधून प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवून लढत देणाऱ्या उमेदवारांची नावे, त्यांचे पक्ष आणि चिन्हांची सविस्तर यादी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने जाहीर केली. त्यामुळे मतदारांसमोर एक चित्र स्पष्ट झाले की प्रत्यक्ष निवडणूक कोण लढवणार आहे आणि त्यांची चिन्ह कोणती असणार आहेत. उमेदवारांच्या पक्ष आणि चिन्हांबाबर कालपर्यंत मतदार संभ्रमात होता कारण की, एका एका उमेदवारांनी तीन तीन पक्षांचे किंवा पक्ष आणि अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरले होते. शेवटी पक्षांचे AB फॉर्म जोडलेल्या आणि तांत्रिक दृष्ट्या पडताळणीत पात्र ठरलेल्या अर्जाचाच विचार करून उमेदवारांनी बाकीचे अर्ज माघार घेतले व पक्ष चिन्ह अंतिम झालेल्या अर्जावर शिक्कामोर्तब करून निवडणूक लढवत आहेत. तर काही पात्र ठरलेले उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ३२ प्रभागांमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय नावे आणि चिन्ह पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला उमेदवारांची नावे, चिन्ह पाहता येतील.

Click to view प्रभागनिहाय उमेदवारांची नावे, पक्ष, अपक्ष आणि त्यांची निवडणूक चिन्हे: संपूर्ण यादी

वरीलप्रमाणे PDF स्वरूपात यादी दिली आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये निवडणूक लढती होणार आहेत. निवडणुकांचे क्विक अपडेट्स जाणून घेण्यासाठी sangavanews.in या न्यूज वेबसाईटला भेट देत रहा. आपल्याकडील काही माहिती असेल किंवा उमेदवारांचे काही अपडेट्स असतील, प्रभागातील काही माहिती, घटना, घडामोडी असतील तर बातमीसाठी किंवा जाहिरातीसाठी सांगावा न्यूज च्या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क करा.

ऑफिसियल संपर्क क्रमांक : ८२६३०८३३२९

ईमेल आयडी : sangavanews19@gmail.com 


Advertise 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा