Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

श्री भगवान बांगर यांच्यावर देश विदेशातून वाढदिसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 भूम तालुक्यातील युवा नेतृत्व भगवान बांगर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा : दिग्गज मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव 


भूम, दि. १९ : सोनगिरी चे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील उभरते नेतृत्व श्री भगवान बांगर यांचा वाढदिवस काल दिनांक १८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. श्री भगवान बांगर यांचा विविध क्षेत्रातली मान्यवरांशी असलेला दांडगा जन संपर्क पाहता गल्ली ते दिल्ली अशा सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योगपती यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून येवून सामाजिक कार्याची आवड असणारे भगवान बांगर हे नेहमीच लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवून धाराशिव चे लोकप्रिय खासदार श्री ओप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांना शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करीत भगवान बांगर यांनी तालुक्यात कार्य सुरू केले त्याचा फायदा झाला आणि ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यात भगवान बांगर यांचा खारीचा वाटा आहेच. पक्ष आणि संघटना यांच्या विचारांच्या पलिकडे जावून देखील केवळ माणुसकी जपून सर्व सामान्य लोकांसाठी कार्य करणारे श्री भगवान बांगर हे भूम तालुक्यात सर्वांच्या परिचयाचे आहेत. काल त्यांचा वाढदिवस सर्वांनी मिळून तालुक्यात विविध ठिकाणी विविध संस्था संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी साजरा केला.  फेस बुक, वॉट्सअप सह इतर सोशल मध्येमांवर वाढदिवसाच्या शुभेच्छा निदर्शनास आल्याच शिवाय मित्र परिवार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून श्री भगवान बांगर यांचा वाढदिवस साजरा केला. 

यामध्ये लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर , लोकप्रिय आमदार श्री पाटील साहेब, धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील काटमोरे साहेब,  सह संपर्कप्रमुख उद्योजक शंकर तात्या बोरकर , भूम परंडा चे माजी आमदार राहुल भैया मोटे,  युवा उद्योजक मा शंकर दादा नागरगोजे बेंगलोर,  युवा सेना जिल्हाप्रमुख डॉक्टर चेतन बोराडे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख हिंदवी ग्रुपचे दिनेश मांगले परंडा,  शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील,  युवा सेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे , धाराशिव जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती सुग्रीव तात्या दराडे,  माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब वनवे पाटील,  शिवसेना महिला तालुका प्रमुख उमाताई रणदवे भूम, तेली समाजाचे नेते रवी आळणीकर, खास बेल्जियम परदेशातुन डॉ अमृता बाळासाहेब कुटे व अमोल बरबडे,  दक्षिण आफ्रिका युगांडा येथुन मित्र परिवार तसेच पुणे येथुन इंजिनीयर महेश बांगर आणि तालुक्यातील विविध ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच सदस्य यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या .

तसेच शिवसेना तालुकाप्रमुख ऍडव्होकेट श्रीनिवास आप्पा जाधवर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास काका शाळु , शिवसेना धाराशिव महिला जिल्हाप्रमुख जिनत सय्यद मॅडम, शिवसेना तालुका उपप्रमुख श्री रामभाऊ नाईकवाडी, परांडा विधानसभा प्रमुख सामना चे पत्रकार प्रल्हाद आडागळे , परंडा २४३ विधानसभेचे समन्वयक दिलीप महाराज शाळु,  शिवसेनेचे विहींग कदम, शिवसेनेचे भूम शहर प्रमुख ऍडव्होकेट आकरे साहेब, शिवसेनेचे विनायक नाईकवाडी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश तात्या मस्कर , माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब उभे पाटील, व्यापारी संघाचे सुनील बांगर साहेब , शिक्षक नेते जयकुमार भोरे सर , मेडिकल असोसिएशनचे अरुण मोराळे , जयवंनगर चे ग्रामपंचायत सदस्य विनोद नागरगोजे, सोनगिरीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी बांगर, सोनगिरी चे सरपंच बालाजी कुटे, आरोग्य विभागाचे राजकुमार पाखरे, युवा विट उद्योजक दीपक कुटे, प्रसिद्ध खव्याचे व्यापारी हनुमंत वनवे, शिवसेनेचे युवा नेते समाधान कुटे, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अनिल कुटे ,कग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष रमेश कुटे , जय भगवान संघटनेचे युवा नेते राजेंद्र कुटे,  शिवसेना महाराष्ट्र राज्याचे शिक्षक शिक्षकेतर संघटना संघटक कोहिनूर सय्यद सर धाडस ग्रुप 2 चे संस्थापक अजित तांबडे व दिपक तांबडे यांनी प्रत्यक्ष केक कापून शुभेच्छा दिल्या तर व्हाट्सअप व मेसेज च्या माध्यमातून किमान एक हजारपेक्षा पेक्षा जास्त लोकं तसेच डॉक्टर, वकील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघटना यांच्या पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील उभरते नेतृत्व श्री भगवान बांगर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा